सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या ३६ ते ५०
🌸 अध्याय पहिला 🌸 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या 🌸 ॥अर्जुनविषादयोग॥ ⛳⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳⛳ 🌼माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।रूढपण उचितां । दिसे भले ॥३६॥ ✏ या (ग्रंथात) मधुरतेलाही गोडी प्राप्त झाली. शोभिवंत वस्तूंना अधिक सुरेखता आली. योग्य वस्तूंना आलेला रुढपणाचा ही सुंदर प्रत्यय आला. 🌼एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।म्हणऊनि जन्मेजयाचे अवलीळा । दोष हरले ।३७| ✏️येथे कलेला कुशलता, पुण्याला अधिक बळ प्राप्त झाले. म्हणूनच जनमेजयाचे दोष (भारत श्रवणाने ) सहज नाहीसे झाले. 🌼आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥३८॥ ✏ क्षणभर विचार केला असता, असे दिसते की या रंगामध्ये आणखी विविध रंगांचा सहभाग किंवा सद्गुणांना आणखी चांगल्या गुणांची साथ अधिकतेने या ग्रंथात आढळते. 🌼भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।तैसे व्यासमती कळवलें । मिरवे विश्व ॥३९॥ ✏ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले त्रैलोक्य तेजोमय दिसते. त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापिलेले सगळे विश्व शोभिवंत दिसते. 🌼कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।तैसे भारतीं सुरवाडले । अ...