सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २रा ||सांख्य योग|| ओवी १५१ ते १६३
ज्ञानेश्वरी अध्याय२रा
🍒 ओवी१५१ ते१६३
🌻 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌼 ||सांख्य योग||
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
(मागील भागावर एक नजर टाका )
🌸अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा।मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा॥१५१॥
✏ अर्जुना, आत्मा हा असा आहे हे तू जाणलेस की मग हा सर्वव्यापी आत्मा दिसला, जाणवला की तुझा हा सर्व शोक नाहीसा होईल.
➖➖➖➖🌈➖➖➖➖
💜अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं।तथापि त्वं महाबाहो नावं शोचितुमर्हसि ॥२६॥
अर्थ 👉- हे महाबाहो, हा आत्मा नेहेमी जन्म पावतो व नेहेमी मृत्यू पावतो असे जरी मानलेस तरी देखील या प्रकारे शोक करण्यास तू योग्य नाहीस. ॥२-२६॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌸अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी।तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा॥ १५२ ॥
✏ अर्जुनाला हा आत्मा अविनाशी आहे, हे समजत नसेल तर; हा आत्मा नाशिवंत आहे असे समजून घे .आणि तरीही तुला शोक करण्याचे कारण नाही.
🌸जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु।जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा॥ १५३ ॥
✏ कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्याप्रमाणे अविच्छिन्न आहे, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा क्रम, प्रवाहही अखंडच आहे, या तिन्ही अवस्थेत आत्मा अखंड व नित्य आहे.
🌸तें आदि नाहीं खंडले । समुद्रीं तरी असे मिनलें।आणि जातचि मध्यें उरले । दिसे जैसें॥ १५४॥
✏ ते गंगेचे पाणी उगमाचे ठिकाणी खंड पावलेले नसते. पुढे ते समुद्रात जाऊन एकसारखे मिळत असते आणि जात असतानाही वाहत्या प्रवाहातही ते पाणीच दिसते.
🌸इये तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं।भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना॥ १५५ ॥
✏ त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे प्राणिमात्राच्या ठिकाणी नेहमी बरोबरच आहेत. आणि ह्या तिन्हींचा प्रवाह कोणालाही थांबवता येत नाही.
🌸म्हणोनि हे आघवें । एथ तुज न लगे शोचावें।जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी॥ १५६ ॥
✏ म्हणून अर्जुना, तुला येथील कोणाविषयीच शोक करण्याची गरजच नाही, कारण स्वभावतःच असा सृष्टीचा क्रम अनादि कालापासून चालत आलेला आहे.
🌸ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना।जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया॥ १५७ ॥
✏ हे प्राणीमात्र जन्ममरणाच्या अधीन आहेत असे पाहून जर हे म्हणणे तुझ्या मनाला पटत नसेल तर;
🌸तरी येथ कांही।तुज शोकासि कारण नाहीं।जे जन्ममृत्यु हे पाहीं ।अपरिहर॥१५८॥
✏ तरीपण यातील कोणाविषयीच तुला येथे शोक करण्याचे कारण नाही कारण हे जन्ममृत्यू अपरिहार्य, अटळ आहेत,
➖➖➖➖🌈➖➖➖➖
💜जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥
अर्थ 👉- उत्पन्न झालेल्याला नि:संशय मृत्यू आहे आणि मेलेल्याला नि:संशय जन्म आहे. म्हणून अपरिहार्य अशा गोष्टीविषयी शोक करणे तुला योग्य नाही. ॥२-२७॥
➖➖➖➖🌈➖➖➖➖
🌸उपजे तें नाशे ।नाशलें पुनरपि दिसे।हें घटिकायंत्र तैसें ।परिभ्रमे गा॥१५९॥
✏ अरे! जे जन्मास आले ते नाश पावणारच आणि जे नाश पावले ते पुन्हा जन्माला येणारच आहे. हे रहाडगाडग्याप्रमाणे सतत चालू असते.
🌸ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें।हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं॥१६०॥
✏ ज्याप्रमाणे दिवसाचा उदय आणि अस्त (दिवस आणि रात्र )होणे हे अखंडित चालू आहे. त्याचप्रमाणे जन्म आणि मरण हे या जगात नित्यक्रमाने चालू आहे. कोणालाही ते टाळता येत नाही.
🌸महाप्रळय अवसरे ।हें त्रैलोक्यही संहरे।म्हणोनि हा परिहरे ।आदि अंतु॥१६१॥
✏ महाप्रलयाच्या वेळीही या त्रैलोक्याचा नाश होतो, म्हणून अर्जुना लक्षात घे, उत्पत्ती व नाश टळत नाहीत.
🌸तूं जरी हे ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी।काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा॥ १६२ ॥
✏ अर्जुना तू जरी आत्म्याला अंतवत मानीत असलास, तरी मग व्यर्थ शोक का करावा? अर्जुना तू शहाणा असूनही, समजून उमजून असे वेडात का शिरतोस ?
🌸एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं॥ १६३ ॥
✏ तुला अजूनही एक गोष्ट सांगतो अर्जुना, पुष्कळ प्रकाराने विचार केला तरी तुला येथे दुःख करण्याचे काहीच कारण नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा