सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १९१ ते २००


 अध्याय दुसरा

💙  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

💟  ||सांख्य योग||

💞  ओवी १९१ते२००

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖➖👇➖➖➖➖

🌻यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम्।सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥३२॥

अर्थ 👉 पार्था, अशा प्रकारचे युद्ध म्हणजे सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार प्राप्त झाले आहे. ते भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होते.

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे॥१९१ ॥

✏ अर्जुना,  हे युद्ध म्हणजे तुम्हा क्षत्रियासाठी तुमचा पूर्वजन्मीचा भाग्योदय झाला असेच समज. अथवा सर्व धर्माचा ठेवा उघड झाला आहे.

🌷हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें।मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥१९२॥

✏ हा तर तुमच्या मूर्तीमंत प्रतापाने स्वर्गच, युद्ध रूपाने तुमच्यापुढे उभा केला आहे. 

🌷ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें।हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥ १९३ ॥

✏ किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त होवून कीर्तीरूप स्त्रीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न  करण्यास) आली आहे .

🌷क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी॥१९४॥

✏ अर्जुना! असल्या प्रकारचे युद्ध क्षत्रियाला सहज प्राप्त होणारे नाही. कारण क्षत्रियाने पुष्कळ पुण्य  करावे, तेव्हा त्याच्या जीवनात असा युद्धप्रसंग प्राप्त  होतो. जसे सहज रस्त्याने जाताना इच्छित फळ देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा. 

🌷ना तरी जांभया पसरे मुख।तेथ अवचटें पडे पीयूख।तैसा संग्रामु हा देख ।पातला असे॥१९५॥

✏ किंवा जांभई देण्यासाठी सहज तोंड उघडावे आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे. तसाच हा युद्ध  प्रसंग अनायासे तुम्हाला चालून आला आहे. 

➖➖➖➖👇➖➖➖➖

🍀अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं॥३३॥

अर्थ 👉 असे असून हा कर्तव्यप्राप्त संग्राम तू करणार नाहीस, तर स्वधर्म व कीर्ती टाकल्यामुळे पाप मात्र मिळवशील.

➖➖➖👆➖➖➖➖

🌷आतां हा ऐसा अव्हेरिजे ।मग नाथिले शोचूं बैसिजे ।तरी आपण आहाणा होईजे।आपणपेयां॥१९६॥

✏ आणि आता तू हा रणसंग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास; तर तू आपणच आपली हानी करून  घेतली असे होईल. 

🌷पूर्वजांचे जोडलें।आपणचि होय धाडिलें।जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥१९७॥

✏ ह्या रणांगणावर तू अशी शस्त्रे टाकलीस; तर तुझीच नाही, तर तुझ्या पूर्वजांनीही जोडलेली  पुण्यकीर्ती तू घालविलीस, असे होईल. 

🌷असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल।आणि गिंवसित पावतील ।महादोष॥१९८॥

✏ तुझी कीर्ती तर जाईलच; पण सर्व जग निंदाही करेल आणि अनेक मोठाले दोष तुला येऊन गाठतील.

🌷जैसी भ्रतारेहीन वनिता।उपहृती पावे सर्वथा ।तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण॥१९९॥

✏ ज्याप्रमाणे पतीविरहीत स्त्री सर्वतोपरी तिरस्करणीय होते 

(त्या काळात माऊलींनी लिहिले  असेल असेल; पण आज या काळात अनेक माताभगिनींनी स्वकर्तृत्वाने पुरूषांना लाजविल असा आपला आणि आपल्या  अपत्यांचा सांभाळ  केलेला  दिसतो. असो कालपरत्वे ओव्यांचे योग्य अर्थ आपण घेऊया.) तसे स्वधर्माचे आचरण न केल्याने (स्वधर्माचा त्याग केल्याने ) जीवाची दशा होते.

🌷ना तरी रणीं शव सांडिजे।तें चौमेरीं गिधीं विदारिजे ।तैसे स्वधर्महीन अभिभविजे ।महादोषी॥२००॥

✏ किंवा रणात प्रेत पडले म्हणजे  ज्याप्रमाणे  चोहोकडून गिधाडे  त्याला फाडतात. त्याप्रमाणे  स्वधर्महीन मनुष्याला महादोष  व्यापून टाकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२