पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 ॐ 卐 भज गोविंदम् 卐 श्लोक ११ मा कुरु धनजन यौवन गर्वं हरति निमेषात्-कालः सर्वम् | मायामयमिदम्-अखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा ‖ ११ ‖ मा = नको कुरु = करू/बाळगू धनजन यौवन गर्वं = स्वतःकडील संपत्ती, माणूसबळ/नातेसंबंध/contacts, स्वतःचे तारुण्य/शरीरसामर्थ्य याबद्दल अभिमान दंभ  हरति = काढून घेतो निमेषात् = एक क्षणात कालः = काळ/वेळ/नियती सर्वम् = सगळं मायामयम् = मायेने बनलेले , भासमान इदम् अखिलं = हे सगळं/सम्पूर्ण हित्वा = सोडून ब्रह्मपदं = ब्रह्मज्ञान यामध्ये त्वं = तू प्रविश = प्रवेश कर विदित्वा = जाणीवपूर्वक स्वतःच्या संपत्तीचा , स्वतःच्या नातेसंबंधांचा , स्वतःच्या तारुण्याचा (तारुण्यसुलभ शारीरिक सामर्थ्याचा ) अभिमान दंभ बाळगू नये. Don't have pride about money men muscle हे सगळं एका क्षणात तुमच्याकडून हिरावून घेण्याची शक्ति काळामध्ये आहे याची अनुभव अनेकांनी आताच्या कोरोना काळात घेतलाय. कितीही पैसा व ओळखी असल्या तरीही साधं बेड मिळवता आलेलं नाही अनेकांना हॉस्पिटलमध्ये अत्यन्त तरुण वय व धडधाकट दिसणारं शरीर असूनही कित्येक जण यमसदनी गेलेत सगळं सम्पत्ती सामर्थ्य आणि संपर्क इथं...
इमेज
 ॥ ॐ ॥ 卐 ॥ भज गोविंदम् ॥卐 श्लोक १० वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः । क्षीणे वित्ते कः परिवारः ज्ञाते तत्त्वे कः संसारः ॥ १० ॥ वयसि गते : तरुण वय निघून गेल्यावर कः कामविकारः : कसली कामवासना  शुष्के नीरे : पाणी आटून गेल्यावर कः कासारः : कसलं सरोवर क्षीणे वित्ते : : पैसे नसतील तर कः परिवारः : कुठले नातेवाईक ज्ञाते तत्त्वे : एकदा तत्त्वज्ञान झाले कि कः संसारः : मग कसला प्रपंच तारुण्य संपले कि कामवासना ही व्यर्थ आहे. उर्वशी उर्वशी हे प्रभुदेवाचं मुकाबला मधलं गाणं "30 उमर का जो है खेल, 60 में खेल के होगा क्या ?", या वाक्याने संपतं !!! कारण त्या वयात जोडीदाराला तुम्ही आकर्षक वाटत नाही आणि कामक्रीडा सक्षमपणे करून त्यातील आनन्द उपभोगता येईल इतकी शारीरिक क्षमता ही नसते. पाणी सुकून आटून गेले असेल तर सरोवर हे नुसता एक खड्डा असते. ते निष्प्रयोजन होते. जवळचा पैसा संपुष्टात आला, अपुरा पडू लागला की गणगोत नातेवाईक तोंड फिरवतात, अनोळखी होतात, काढता पाय घेतात. असतील शिते, तर जमतील भुते !!! असे व्यतिरेकाने 3 बाबींची निरर्थकता सांगितल्या नन्तर, त्याच चालीवर , तत्त्वज्ञान लाभल्यानंतर, ...
इमेज
 卐 । भज गोविंदम् । 卐 । श्लोक ९ । सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् | निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ‖ 9 ‖ सत्सङ्गत्वे = चांगल्या संगतीमुळे निस्सङ्गत्वं = अलिप्तता निस्सङ्गत्वे = अलिप्ततेमुळे निर्मोहत्वम् = मोह नाश निर्मोहत्वे = मोह नाशामुळे निश्चलतत्त्वं = शाश्वत तत्त्व प्राप्ति निश्चलतत्त्वे = शाश्वत तत्त्व प्राप्ति मुळे जीवन्मुक्तिः = जिवंतपणी मुक्ती मोक्ष कैवल्य , संजीवन समाधि 🙏 चांगली संगत ही व्यक्तींची किंवा विचारांची असू शकते आजकालच्या जगात तर चांगली संगत ही सुदूर अंतरावरूनही लाभू शकते ऑनलाईन किंवा इंटरनेट हे साधन त्या अर्थाने वरदान होय. अनेक युट्यूब चॅनेल वर जो मनोबोध निरूपणाचा वरप्रसाद उपलब्ध आहे, तो अशाच सुदूर सत्संगतीचा उत्तम दाखला आहे अशा प्रत्यक्ष किंवा शाब्दिक किंवा ऑनलाइन अशा वैयक्तिक अथवा वैचारिक सत्संगतीमुळे प्रबोधन संभवते हे प्रबोधन अलिप्तता साधण्यास उपयोगी आहे प्रपंच सोडून परमार्थ नाही करायचाय उलट प्रपंच नेटका करून स्वीकृत कर्तव्यपूर्ती व तज्जन्य कृतकृत्यतेचे समाधान मिळवायचे आहेच पण ते मी केलं या अहंकाराने नव्हे तर भगवंताने ...
इमेज
 ॥卐 भज गोविंदम् 卐॥ ॥ श्लोक ८ ॥ आज थोडे बंडखोर हटके पचायला अवघड विचार !!! का ते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः | कस्य त्वं वा कुत आयातः तत्वं चिन्तय तदिह भ्रातः ‖ ८ ‖ का : कोण ते : तुझी कान्ता : पत्नी कस्ते पुत्रः : कोण तुझा पुत्र संसारो अयम् : हा संसार हे जग  अतीव विचित्रः : अत्यंत विचित्र विलक्षण कस्य त्वं : तू कुणाचा वा : किंवा कुत आयातः : कुठून आला आहेस तत्वं चिन्तय तद् : या मूलभूत गोष्टींचा विचार कर इह : येथे आतातरी भ्रातः बंधो भावा भावड्या भैय्या कोण तुझी पत्नी? कोण तुझा पुत्र? हा संसार प्रपंच अत्यन्त विचित्र विलक्षण अनाकलनीय आहे! तू (स्वतः; खरंतर) कुणाचा आहेस? तू (मुळात) कुठून आला आहेस? या मूलभूत गोष्टींचा येथे आतातरी , या वयात तरी विचार कर!! आपले लग्न झाल्यापासून आपला जोडीदार व त्याच्यापासून उत्पन्न होणारी संतती यांनाच केंद्रस्थानी ठेवूनच प्रत्येक स्त्रीपुरुषाचे जीवन सुरू असते आपल्या लग्नापूर्वी हीच भूमिका आपले आईवडील निभावत असतात पिढ्यानुपिढ्या शतकानुशतके हेच सुरू आहे यात काही चुकीचं नाहीये,  समाजधारणेसाठी ही गृहस्थाश्रम नावाची उत्तरदायित्व स्वीकारणारी ...
इमेज
 भज गोविंदम्। श्लोक 7 बाल स्तावत् क्रीडासक्तः तरुण स्तावत् तरुणीसक्तः | वृद्ध स्तावत्-चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः ‖ 7 ‖ लहानपणी खेळण्यामध्ये वेळ दवडला जातो, तारुण्य हे स्त्रीविषयक किंवा पत्नी मुले या संसारविषयक गोष्टीतच  सरते, आणि वृद्धपणी नाना प्रकारच्या व्यर्थ चिंता करण्यात कालापव्यय होतो जिंदगी जब तक रहेगी फुरसत न मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से हे वाक्य तुळशीबागेतील राममंदिरातून लक्ष्मी रस्त्याच्या द्वारातून बाहेर पडताना वरती लिहिलेले आहे (आता नूतनीकरण मध्ये नसेल राहिलं कदाचित) लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया वोही किस्सा पुराना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है ना हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है किंवा बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर जन्म मरण नको आता, नको येरझार नको ऐहिकचा नाथा व्यर्थ बडिवार चराचरापार न्या हो, जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ही गाणी सर्वांना परिचित आहेतच आताच्या स्क्रीन (TV ...
इमेज
 ॥ भज गोविंदम् ॥ श्लोक 6 यावत्-पवनो निवसति देहे तावत्-पृच्छति कुशलं गेहे | गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये ‖6‖ यावत् = जोपर्यंत पवनो = श्वास (वायु) निवसति = निवास करत आहे देहे = शरीरात तावत् = तोपर्यंत पृच्छति = विचारपूस केली जाते कुशलं = क्षेमकुशल गेहे = घरात गतवति = निघून गेल्यानंतर वायौ = श्वास वायु देहापाये = देह पडल्यावर, मरण पावल्यावर भार्या = स्वतःची पत्नी देखील बिभ्यति = घाबरते तस्मिन् = त्या  काये = मृत शरीराला जोपर्यंत शरीरात श्वासोच्छ्वास सुरू आहे म्हणजे मनुष्य जिवन्त आहे (भले मग icu मध्ये व्हेंटिलेटरवर बेशुद्ध स्थितीत का असेना?!), तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या स्वास्थ्याबद्दल प्रेमळपणे विचारपूस करतात. पण जेव्हा जीवन-श्वास थांबतो आणि शरीर हे गतप्राण अवस्थेत प्रेतरूप होऊन अचेतन अवस्थेत पडते, तेव्हा त्याची स्वतःची पत्नी जिने जीवनभर साथ सोबत दिली आहे, ती सुद्धा त्या प्रेताला भीत असते. भज गोविंदम् हे भजन सूक्त निर्वाणसमय समीप आला असताना करून अतिशय स्पष्ट कठोर शब्दात करून दिलेली सत्याची जाणीव आहे विशेषतः जे 50-60-70 च्या वयात आहेत त्यांना जी...
इमेज
 भज गोविंदम् । श्लोक 5 यावद्-वित्तोपार्जन सक्तः तावन्-निजपरिवारो रक्तः | पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ‖ 5 ‖ यावद् = जोपर्यंत, जोवर वित्तोपार्जन = धनार्जन, पैसे मिळवणे सक्तः = व्यग्र, गुंतलेला, रत, busy पाठभेद शक्त: = समर्थ, सक्षम तावत् = तोपर्यंत, तोवर निजपरिवारो = (त्याचे) स्वतःचे कुटुंब परिवार रक्तः  = अनुकूल, प्रेम करणारे, रस असणारे पश्चात् = त्यानंतर मात्र, धनार्जन क्षमता सम्पल्यावर कमी झाल्यावर जीवति = जगतो , जीवन कंठतो, दिवस काढतो जर्जर = म्हाताऱ्या, वृद्ध, खिळखिळ्या देहे = शरीरात शरीराने वार्तां = ख्यालीखुशाली क्षेमकुशल चौकशी दखल कोऽपि = कुणीही न पृच्छति = विचारत नाही गेहे = घरामध्ये घरामधील जोपर्यंत माणूस संपत्ती/पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे, तोपर्यंतच त्याच्या सभोवतालचे सर्व कुटुंबीय आपुलकी प्रेम काळजी करतात. परंतु जेव्हा त्याचे शरीर म्हातारपणामुळे तो खचते, तेव्हा मात्र घरी कोणीही त्याची काळजी करत नाही, त्याच्याशी एक शब्द देखील बोलत नाही, विचारपूस करत नाही अतिशय विदारक असे कटू सत्य शंकराचार्य सांगत आहेत कि जोपर्यंत ...
इमेज
 भज गोविंदम् । श्लोक 4 नलिनी-दलगत-जलम् अतितरलं तद्वज्जीवितम् अतिशयचपलम् | विद्धि व्याध्यभिमान-ग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम् ‖ 4 ‖ कमळाच्या पानावर पडलेलं पाणी तिथंच स्थिर राहू शकत नाही, ते कोणत्याही क्षणी तिथून घरंगळून खाली पडू शकतं; अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवन हे क्षणभंगुर अशाश्वत अनिश्चित आहे. याचा विदारक अनुभव कोरोनाच्या काळात दीड दोन वर्षे जगभर सर्वांनी घेतला आहेच जीवन जर इतकं अनपेक्षित धक्कादायक unpredictable अनिश्चिततेने भरलेले आहे तर मग अशा स्थितीत (विशेषतः जे पैलतीराच्या जवळ पोहोचलेत त्यांनी तरी) धनसंचय व भोगलालसा यांपासून परावृत्त होऊन, भगवद्भक्तिमध्ये मन रमवले पाहिजे आणि त्यासाठीच भज गोविंदम् । जीवन जसे चंचल आहे तसेच धन आणि विविध भोग विषय सुदधा (लालसा वासना कामना इच्छा यांचे विषयही) तितकेच चंचल आहेत, म्हणूनच त्यात गुंतून राहण्यापेक्षा भज गोविंदम् हे हितकर होय माणूस नेहमी भविष्यासाठी / उद्यासाठी पैसे साठवून ठेवत असतो, परंतु ते भविष्य, तो उद्या ... "आता" प्रत्यक्षात येऊन उभा ठाकलाय, तेव्हा तरी 'मिळवत राहण्यापेक्षा', त्या अर्जित / संचित धनाचा उचित उपभोग विनियोग...
इमेज
 भज गोविंदम् श्लोक 3 नारी स्तनभरनाभीदेशं दृष्ट्वा मा गा मोहावेशम् | एतन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारंवारम् ‖ 3 ‖ जीवनात जरी धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ असले तरीही प्रत्येक मनुष्य स्वभावतःच अर्थ व काम यातच अधिक लिप्त व्यग्र गुरफटलेला असतो अधिकाधिक धन मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहणे हे जसे प्राय बहुसंख्य माणसांबाबत समाजात दिसून तसेच आवाज फुटल्यापासून ते अगदी 80-90 वय झाले तरी स्त्री देहाबद्दलचे आकर्षण संपत नाही. ते तसेच राहते. व्यक्तिपरत्वे ते कमी अधिक होत असले तरी सार्वत्रिकपणे Men will be Men हे सहजपणे प्रत्ययास येते. लैंगिक सुखाची इच्छा ही तसे पाहता प्राणीमात्रांत असतेच, ... त्या त्या प्राण्यात, अगदी वनस्पतींमध्येही त्याचा बहर येण्याचा, ग्रामीण भाषेत माजावर येण्याचा काळ हा वर्षातील काही विशिष्ट दिवसांपुरताच असतो परंतु मनुष्यात मात्र ही लालसा प्रतिक्षण असतेच! पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ही भावना त्यामानाने अल्प प्रमाणात असते कारण अपत्य जन्मानंतर तिचे भावनिक प्राधान्य हे शृंगाराकडून वात्सल्याकडे जाते! म्हणूनच स्त्री ही क्षणकाळासाठी पत्नी तर अनंतकाळाची माता आहे...
इमेज
 भज गोविंदम् ।। श्लोक 2 ।। मूढ जहीहि  धनागमतृष्णाम् ,  कुरु सद्बुद्धिं  मनसि वितृष्णाम् । यत् लभसे  निजकर्मोपात्तम्,  वित्तं तेन  विनोदय चित्तम् ॥ ०२॥ मराठी : अरे वेड्या, संपत्ती गोळा करत राहण्याच्या लालसेला दूर सार.  आपल्या मनात चांगले विचार करून सतत काहीतरी मिळवत राहण्याच्या इच्छेपासून मुक्तता मिळव.  तुझ्या कर्मानुसार जे धन तुला मिळते , त्यातच आपल्या मनाचे समाधान मान. मूढ हा मुह् (मोह) यापासून बनलेला भूतकाळ वाचक शब्द आहे मुग्ध मोहित हे ही तसेच शब्द होत मोहः कार्याकार्यानभिज्ञत्वम्। मोह म्हणजे काय करावे , काय करू नये, याचा निर्णय घेता न येणे अशी अवस्था. गंमतीने मी मोह शब्दाची व्याख्या/definition ही रंगीला चित्रपटातील गाण्यात आहे, असं सांगतो ... क्या करे क्या ना करे , ये कैसी मुश्किल हाय 😊 अर्जुनाला पहिल्या अध्यायात मोह झाला होता म्हणून शेवटच्या अध्यायात तो स्वतः मान्य करतो कि नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा । मोह याचा सध्याच्या मराठीत जो अर्थ होतो, तो खरंतर लोभ आहे. तर मूढ याचा व्यावहारिक सम्बोधन या दृष्टीने अर्थ मूर्ख वेडा असा आहे जसे अंतकाळी कृ ...
इमेज
 श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९ भक्ति योग अनन्य भक्ति योग तोडोनि संस्कृताचे अरण्य । प्रकटविले ज्ञानाचे हिरण्य । ज्ञानेश्वर माऊलीचे कारुण्य । धेनूची वत्सावरी जणू ।। 30 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी वाचली तेव्हा लिहिलेली ही स्वरचित ओवी!!! सारांश कि गोषवारा!? या अध्यायाचा सारांश एका एका श्लोकात सांगणं शक्य आहे किंवा खरंतर एकाच श्लोकात सांगता येईल गोषवारा म्हटलं कि अध्यायात कोणकोणते विषय आहेत ते सांगणं, त्याची परस्पर संगती सांगणं व त्यावर स्वतःला उमगलेले आहे ते शब्दांत मांडणं सारांश एकाच श्लोकात असा कि , अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।। अनन्य म्हणजे दुसरं कुणीही नाही, एकच. एकाग्र भावनेने.  पर्युपासना. परि म्हणजे सर्व बाजूंनी. नित्य अभियुक्त म्हणजे always connected. कधीतरी, वेळ मिळेल तसं असं नाही. तर निरंतर , प्रत्येक क्षणी उपास्य दैवताशी एकनिष्ठ असणं अशा भक्ताचा योगक्षेम भगवन्त चालवतात योग म्हणजे जे नाही ते आणून देणे, ज्याची उणीव आहे, त्याची पूर्तता करणे. क्षेम म्हणजे जे दिलेले आहे, ते चिरंतन टिकवून ठेवणे maintain करणे सोप्या मराठीत , ...
इमेज
  भज गोविंदम्' हे जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले काव्य आहे. लौकिक अर्थाने हे कोण्या देवतेचे स्तोत्र नसून ही एक छोटीशी रचना आहे. ताला सुरावर भजन म्हणून ते गायले गेले असले तरी त्यात वेदांताचे सार आहे आणि त्यात मनुष्याला एक विनवणी केली आहे की, विचार कर.... मी इथे या जीवनात का आहे? मी संपत्ती, कुटूंब एकत्र करीत आहे, परंतु मनाला शांतता का लाभत नाही? सत्य काय आहे? जीवनाचा हेतू काय आहे? अशा प्रकारे विचार जागृत केलेली व्यक्ती दैवी तत्त्वाकडे परत वळते. आचार्यांचे शब्द खूपच भेदक व कठोर वाटतात आणि त्यात मुक्ती प्राप्त करण्याचे एक निश्चित तत्वज्ञान आहे. या रचनेच्या मुळाशी एक घटना आहे. आदि शंकराचार्यांच्या काशी मुक्कामात त्यांना गंगातीरी पाणिनीय संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करणारा एक वृद्ध दिसला. त्याची केवळ बौद्धिक कसरतीची चाललेली दुर्दशा पाहून आचार्यांना कीव वाटली की, आयुष्याच्या या वळणावर व्याकरणापेक्षा प्रार्थना आणि मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ घालवणे हे अधिक चांगले. जगातील बहुसंख्य लोक ईश्वरी चिंतनाऐवजी केवळ बौद्धिक, इंद्रिय सुखात व्यग्र आहेत. हे पाहून त्यांना 'भज गोविंद' हे उ...

भज गोविंदम् व गुरुपादुकाष्टक

इमेज
 नमस्कार 🙏🏼 भज गोविंदम् । ॥ प्रथम श्लोक ॥ 🪔💐🙏🏼🪷 श्री आदि शंकराचार्य यांनी रचिलेले हे भजन सूक्त स्तोत्र फटका अतिशय गेय श्रवणीय मननीय व अनुनेय आहे गो म्हणजे गाय गो म्हणजे पृथ्वी गो म्हणजे इंद्रिये विंद म्हणजे लाभ प्राप्त करणारा, पालनकर्ता लौकिक अर्थाने गोपाळ पारमार्थिक अर्थाने जगत्पालक तसेच इंद्रियांचा स्वामी अशा त्या गोविंद भगवान श्रीकृष्ण यांचे भजन कर 🙏🏼 सु म्हणजे चांगले, उक्त म्हणजे म्हटलेले उच्चारलेले लिहिलेले गायलेले. भज गोविंदम् हे म्हणून सूक्त आहे पिण्याचे साधन पात्र, नेण्याचे साधन नेत्र तसे स्तुति करण्याचे साधन म्हणजे स्तोत्र, यात भगवान श्रीकृष्ण यांची स्तुति आहे म्हणून भज गोविंदम् हे स्तोत्र होय आणि हे नेहमीसारखे गोड मृदु शांत शब्दात गुंफलेले नसून; थोडं कठोर स्पष्ट व कानउघाडणी स्वरूपात प्रस्तुत केले आहे म्हणून भज गोविंदम् हा फटका आहे, असं माझं वैयक्तिक मत 🙂 प्रत्यक्षात श्रीमद्भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला खडसावूनच भगवान श्रीकृष्ण पुढील संवाद उपदेश प्रारंभ करतात 👇🏼 कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्। अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम् अर्जुन।। क्लैब्यं मा स्म गमः पार्थ...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी ६३ पासून ७५ पर्यंत

इमेज
  हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां॥६३॥ ✏ प्रभू आपले ह्रदय  सखोल  आहे म्हणून आपल्या  चरणापाशी ही लडिवाळपणे विनंती केली आहे. हा माझा  उन्मत्तपणा नाही. 🔰जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी॥ ६४॥ ✏ ज्याप्रमाणे  लहान  मूल बोबडे बोल  बोलते तरी आईवडिलांना  त्याचे ही कौतुकच असते. तसा त्यांचा स्वभावच असतो . 🔰तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी॥६५॥ ✏ ज्याअर्थी आपण संत मायबापांनी माझा अंगीकार केला आहे त्याअर्थी  आपण माझे काही  उणे बोल आपण सहज सहन करालच.  🔰परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें । ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥६६॥ ✏ पण  तरीही  मी विनंती करतो कारण  मी प्रत्यक्ष  गीतेचा अनुवाद करतो आहे म्हणून  माझ्याकडे  लक्ष  द्यावे  ही विनंती  🙏 (माऊलींची  लीनता लक्षात घ्या ) 🔰हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा...

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२

इमेज
  ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे।।५१॥ ✏ माऊली  म्हणतात की अशी कल्पना  करा की व्यास ऋषींनी (चार  वेद) ज्ञानरूपी शब्दांचा समुद्र बूद्धीरूपी रवीने घुसळून महाभारत रूपी लोणी बाहेर  काढले  आहे. 🌷मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके । पद आले परिपाकें । आनंदाची॥५२॥ ✏ नंतर त्या   लोण्याला   ज्ञानरूपी  अग्नीच्या  आचेवर  विचाररूप कढ आला आणि पद्यरूपी साजूक  तूप  तयार  झाले तीच  ही गीता. 🌷जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ॥ ५३॥ ✏  ज्या  गीतेची विरक्त  लोक, इच्छा  धरतात,  संत तिचा अनुभव  घेतात आणि ब्रह्मनिष्ठ जन तिचे ठिकाणी  रममाण होतात.   🌷जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल॥ ५४॥ ✏ ही कथा त्रिजगती  ऐकण्यास योग्य परमपूज्य  आहे. 🌷जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे। जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं॥५५॥ ✏ या कथेला भगवतगीता म्हणता...