卐 । भज गोविंदम् । 卐
। श्लोक ९ ।
सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं
निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् |
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं
निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ‖ 9 ‖
सत्सङ्गत्वे = चांगल्या संगतीमुळे
निस्सङ्गत्वं = अलिप्तता
निस्सङ्गत्वे = अलिप्ततेमुळे
निर्मोहत्वम् = मोह नाश
निर्मोहत्वे = मोह नाशामुळे
निश्चलतत्त्वं = शाश्वत तत्त्व प्राप्ति
निश्चलतत्त्वे = शाश्वत तत्त्व प्राप्ति मुळे
जीवन्मुक्तिः = जिवंतपणी मुक्ती मोक्ष कैवल्य , संजीवन समाधि 🙏
चांगली संगत ही व्यक्तींची किंवा विचारांची असू शकते
आजकालच्या जगात तर चांगली संगत ही सुदूर अंतरावरूनही लाभू शकते
ऑनलाईन किंवा इंटरनेट हे साधन त्या अर्थाने वरदान होय.
अनेक युट्यूब चॅनेल वर जो मनोबोध निरूपणाचा वरप्रसाद उपलब्ध आहे, तो अशाच सुदूर सत्संगतीचा उत्तम दाखला आहे
अशा प्रत्यक्ष किंवा शाब्दिक किंवा ऑनलाइन अशा वैयक्तिक अथवा वैचारिक सत्संगतीमुळे प्रबोधन संभवते
हे प्रबोधन अलिप्तता साधण्यास उपयोगी आहे
प्रपंच सोडून परमार्थ नाही करायचाय
उलट प्रपंच नेटका करून स्वीकृत कर्तव्यपूर्ती व तज्जन्य कृतकृत्यतेचे समाधान मिळवायचे आहेच
पण ते मी केलं या अहंकाराने नव्हे तर भगवंताने करून घेतलं या भावनेने !!!
प्राथमिक कर्तव्यपूर्ती नन्तर पुढील उन्नती प्रगती म्हणजे या सर्व लौकिक व्यवहारात राहूनही त्यापेक्षा माझे जीवनकार्य जीवनप्रयोजन हे जाणून त्यासाठी सजगपणे प्रयत्नरत राहणे ही अलिप्तता
पाण्यात राहूनही कमलपत्र ओले होत नाही तसे
संसार से भागे फिरते हो
भगवान को तुम क्या पाओगे
इस लोक को भी अपना न सके
उस लोक में भी पछताओगे
संसार सेे भागे फिरते हो...
ये पाप है क्या, ये पुण्य है क्या
रीतों पर धर्म की मोहरें हैं
हर युग में बदलते धर्मों को
कैसे आदर्श बनाओगे
संसार से भागे फिरते...
ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचेता का होगा
रचना को अगर ठुकराओगे
संसार से भागे फिरते...
हम कहते हैं ये जग अपना है
तुम कहते हो झूठा सपना है
हम जन्म बिता कर जायेंगे
तुम जन्म गँवा कर जाओगे
संसार से भागे फिरते...
👆🏼 हे भान न सोडता पारमार्थिक ज्ञान व मोक्षगामी आचरण करता येते
अलिप्तता साधली कि मग मोह नष्ट होतो, काय करावे काय करू नये यातला गोंधळ संपतो, संसारात राहूनही विरक्ती निवृत्ती जमते. इदम् न मम ही सोडवणूक शक्य होते. अधिकार पुढच्या कडे सुपूर्द/हस्तांतरित करता येतात. Delegation of work load किंवा passing on the batton हे या संसारक्रीडेचा भाग आहे हे उमगतं!
मोह नष्ट झाला कि स्मृति म्हणजेच योग्य ज्ञानाचा उदय होतो अर्थातच जीवन प्रयोजन गवसते
म्हणून तर संग सुटावा , मोह मिटावा यासाठीच गृहस्थाश्रम नन्तर 50 व्या वयात वानप्रस्थाश्रम आणि त्यापुढे जगलात तर 75व्या वयात संन्यासाश्रम अशी आयुष्याची 4 आश्रमात विभागणी सनातन संस्कृती मध्ये केलेली आहे
सत्संगति ... निःसंग ... निर्मोह ... या सोपानक्रमानंतर ... निश्चल तत्त्व सापडते
निश्चल तत्त्व म्हणजे चंचल अस्थिर क्षणभंगुर अशाश्वत अशा सर्वच लौकिक व्यावहारिक सांसारिक बाबींच्या पलीकडे Above & Beyond असलेले सारतत्त्व अनुभवता येते
ते म्हणजे विश्वचैतन्य, परमात्मा, ब्रह्मतेज !!!
आणि एकदा हे मन स्वतःहून 10 बहिर्मुख इंद्रियांपासून परावृत्त होऊन जाणीवपूर्वक अंतर्मुख झाले कि आत्मस्थे मनसि स्थिरे अशी सम अधि म्हणजे समाधि मुक्ति मोक्ष कैवल्य ही स्थिती देहधारण करत असतानाच अनुभवता येते
आणि मग आता उरला उपकारापुरता असे समर्पित जीवन जगता येते
अणुरेणिया थोकडा | तुका आकाशाएवढा ||१||
गिळुन सांडिले कलेवर | भव भ्रमाचा आकार ||२||
सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटी ||३||
तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता ||४||
Being in the company of good people (saints) gives rise to non-attachment; from non-attachment comes freedom from delusion, which leads to awareness of reality; understanding of reality gives rise to emancipation leading to the liberation of the soul (jīvan-mukti), while still alive.
सत्संगत्वे — in good company, good association;
निःसंगत्वम् — renounced, detachment; निर्मोहत्वम् — non-infatuated, non-delusion, clear-minded;
निश्चलत्वम् — tranquillity, immutable reality, truth;
जीवन्मुक्ति — liberated soul, emancipation while still alive.
त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।
वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा