भज गोविंदम्

श्लोक 3


नारी स्तनभरनाभीदेशं

दृष्ट्वा मा गा मोहावेशम् |

एतन्मांसवसादिविकारं

मनसि विचिन्तय वारंवारम् ‖ 3 ‖


जीवनात जरी धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ असले तरीही प्रत्येक मनुष्य स्वभावतःच अर्थ व काम यातच अधिक लिप्त व्यग्र गुरफटलेला असतो


अधिकाधिक धन मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहणे हे जसे प्राय बहुसंख्य माणसांबाबत समाजात दिसून तसेच आवाज फुटल्यापासून ते अगदी 80-90 वय झाले तरी स्त्री देहाबद्दलचे आकर्षण संपत नाही. ते तसेच राहते. व्यक्तिपरत्वे ते कमी अधिक होत असले तरी सार्वत्रिकपणे Men will be Men हे सहजपणे प्रत्ययास येते. लैंगिक सुखाची इच्छा ही तसे पाहता प्राणीमात्रांत असतेच, ... त्या त्या प्राण्यात, अगदी वनस्पतींमध्येही त्याचा बहर येण्याचा, ग्रामीण भाषेत माजावर येण्याचा काळ हा वर्षातील काही विशिष्ट दिवसांपुरताच असतो परंतु मनुष्यात मात्र ही लालसा प्रतिक्षण असतेच!


पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ही भावना त्यामानाने अल्प प्रमाणात असते कारण अपत्य जन्मानंतर तिचे भावनिक प्राधान्य हे शृंगाराकडून वात्सल्याकडे जाते! म्हणूनच स्त्री ही क्षणकाळासाठी पत्नी तर अनंतकाळाची माता आहे!!


स्त्री धन व अन्न हे नित्य आवरणाखाली असावेत हेही सत्यच आहे. कारण ते गुप्त नसतील, उघडे असतील accessible असतील तर कुणालाही ते बळकावण्याची दुर्वासना होऊ शकते


प्रस्तुत श्लोकात जरी उदाहरण म्हणून स्त्रीदेहातील काही विशिष्ट लक्षवेधी अवयवांचा निर्देश असला तरी 

देश काळाच्या मान्यतेनुसार जगभर स्त्री सौंदर्य याचे criteria बदलतील पण जगभर स्त्री देहाबद्दलचं आकर्षण ही सार्वकालिक सार्वत्रिक बाब आहे


म्हणूनच अनवस्था प्रसंगाला निमंत्रण मिळू नये यासाठी स्त्री देह हा अवगुंठित असावा ही समाजधुरीणांची मानसिकता त्या अर्थाने समर्थनीय आहेच


विगत 50 ते 100 वर्षात ज्या पद्धतीने स्त्री वेष/केश भूषा यात जे विलक्षण बदल होत गेले आहेत ते स्वीकार्य समर्थनीय आहेत असं नक्कीच नाही.

Attention Seeking अशा प्रकारची उत्तान वस्त्रे व केशरचना करणं हे काही विशिष्ट वयात काही स्त्रियांना योग्य वाटत असेलही परंतु डोईवर पदर, पदरात चेहरा, डोळ्याच्या पापणीत, लाजेचा पहारा किंवा आम्ही कुळवंतांच्या कन्या, चाफेकळी पानाआड हे खरोखरच लोभस आहे!


म्हणूनच उभय बाजूनी स्त्रीदेह हा अधःपतन करण्यास कारणीभूत होणार नाही, असं आचरण/संस्कार होणे, हे हितावह आहे.


स्त्रीदेहाबद्दल स्वाभाविक असले तरीही अनावश्यक आकर्षण निर्माण होऊ नये, म्हणून स्त्रीदेह हा शरीरशास्त्र/biology नुसार, केवळ मांस मेद व तत्सम घटकांपासून बनलेला समूह आहे, असे बिंबवण्याचा प्रयत्न या श्लोकात केलेला आहे.


या पद्धतीची विचारसरणी ही प्राय सर्वच वैराग्यपर उपदेशात आलेली आहे


शरीरं हि रसमलस्नाय्वादिरूपतया भाव्यमानं वैराग्यहेतुर्भवति; यथा ...

मज्जाऽस्थ्ना रजसा प्लीह्ना 

यकृता शकृताऽपि च। 

पूर्णाः स्नायुसिराभिश्च 

स्त्रियश्चर्मप्रसेविकाः 

इत्यादिका वैराग्यभावना।

👆🏼

असे चरकसंहिता शारीरस्थान अध्याय 5 श्लोक 11-12 च्या टीकेमध्ये आचार्य चक्रपाणि म्हणतात.


शरीर हे रक्त विष्ठा स्नायु इत्यादींनी बनलेले/भरलेले आहे असे जाणल्याने त्याच्या भासमान बाह्य सौंदर्यापासून वैराग्य येऊ शकते


वरून दृष्टीला सुंदर भासणारा हा स्त्रीदेह रक्त मांस मल मूत्र इत्यादींनी भरलेली चमड्याची पिशवी आहे, असा पुन्हा पुन्हा विचार केला, स्वतःला बजावलं, तर स्त्रीदेह आकर्षणापासून स्वतःला विरक्त करणं कदाचित जमेल


थोडक्यात मानवी जीवनात मोहाची लोभाची अध:पतनाची जी 2 मुख्य निसरडी स्थाने आहेत ती या 2 श्लोकात सांगितली आहेत


अर्थातुराणां न सुखं न निद्रा ।

कामातुराणां न भयं न लज्जा ।


मागील श्लोकात धनागमतृष्णा व प्रस्तुत श्लोकात स्त्री देह आकर्षण या दोहोंपासून मनाला आवरून सावरून सांभाळून बजावून भगवद्भक्तिमध्ये नामस्मरणामध्ये त्याला रमवणे यासाठीच तर हे भजन सूक्त आहे ... भज गोविंदम् भज गोविंदम् ।।


नारी स्तनभरनाभीदेशं

दृष्ट्वा मा गा मोहावेशम् |

एतन्मांसवसादिविकारं

मनसि विचिन्तय वारंवारम् ‖ 3 ‖


Do not get drowned in delusion, infatuated with passion and lusty desires, 

by seeing a woman’s raised breasts and navel. 

These are nothing but a modification of flesh and fat, and the like. 

Do not fail to remember this again and again in your mind.


nārī — woman; 

stanabhara — full breasts;

nābhī-deśaṁ — region of navel; 

dṛṣṭvā — having seen; 

mā gā — dont go; 

mohāveśam — infatuated seizure; 

etan — this; 

māṁsāvasādi — modifications of flesh, fat, etc; 

vikāraṁ — modified appearance;

manasi — in the mind; 

vicintaya — think well, consider; 

vāraṁ — again; 

vāram — and again.


🙏🏼

वैद्य हृषीकेश म्हेत्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२