भज गोविंदम्। श्लोक 7
बाल स्तावत् क्रीडासक्तः
तरुण स्तावत् तरुणीसक्तः |
वृद्ध स्तावत्-चिन्तामग्नः
परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः ‖ 7 ‖
लहानपणी खेळण्यामध्ये वेळ दवडला जातो,
तारुण्य हे स्त्रीविषयक किंवा पत्नी मुले या संसारविषयक गोष्टीतच सरते,
आणि वृद्धपणी नाना प्रकारच्या व्यर्थ चिंता करण्यात कालापव्यय होतो
जिंदगी जब तक रहेगी
फुरसत न मिलेगी काम से
कुछ समय ऐसा निकालो
प्रेम कर लो श्रीराम से
हे वाक्य तुळशीबागेतील राममंदिरातून लक्ष्मी रस्त्याच्या द्वारातून बाहेर पडताना वरती लिहिलेले आहे (आता नूतनीकरण मध्ये नसेल राहिलं कदाचित)
लड़कपन खेल में खोया
जवानी नींद भर सोया
बुढ़ापा देख कर रोया
वोही किस्सा पुराना है
सजन रे झूठ मत बोलो
खुदा के पास जाना है
ना हाथी है ना घोड़ा है
वहाँ पैदल ही जाना है
किंवा
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर
जन्म मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरापार न्या हो, जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
ही गाणी सर्वांना परिचित आहेतच
आताच्या स्क्रीन (TV लॅपटॉप मोबाईल) मध्ये अडकलेल्या बालवयातील मुलांना त्या घरातील वृद्ध आजी आजोबा यांनी आणि तरुण आई वडील काका काकू मामा मामी यांनी हरिभक्ति सनातन धर्म संत साहित्य सम्पन्न लोक कला/गीत मराठी मानबिंदू भारतीय संस्कृती यांचा परिचय करून देणे व ती आपली अस्मिता अस्तित्व अभिमान व आदरस्थान आहे याची जाणीवपूर्वक रुजवणी करून दिलीच पाहिजे
बालपणापासून जर या गोष्टींशी त्याची नाळ जुळली तर ती मुलं तारुण्यात सक्षम समर्थ सुदृढ समाज निर्माण करतील
तरुण कर्त्या पिढीनेही धनार्जनासोबतच वरील बाबींशी स्वतःला जोडून सहभागी करून ठेवलं पाहिजे, तरच आपलं अस्तित्व ठळकपणे मान्य केलं जाईल
आपल्या परंपरांबद्दल आपल्यालाच आपुलकी आदर नसेल तर तो वारसा पुढील पिढीला देता येणार नाही
इतर धर्मीयांकडून ते शिकण्याजोगे आहे
नुसता हल्लागुल्ला धांगडधिंगा ही आपली संस्कृती परंपरा नसून त्याच्यामागे उदात्त संकल्पना व सुबुद्ध शास्त्रीयता आहे हे पटवून समजून उमजून ते आचरलं गेलं पाहिजे
उपचार, करायचं म्हणून, कसंतरी उरकाउरकी असं ते असू नये
आणि या सर्वांबाबत अनुभवसंपन्न समृद्ध असं सोपपत्तिक प्रेरक मार्गदर्शन करणं हे वृद्ध व्यक्तींचे कर्तव्य आहे
तिन्ही पिढ्या जर डोळसपणे स्वाभाविक मोह ह्या दुर्गतीच्या घसरणीच्या वाटेवर न फसता, संयमाने सन्मार्गावर चालू लागतील तर मग
जे ब्रह्मज्ञान नामक संस्कृतीचे जे मूळ अधिष्ठान आहे त्याविषयी जिज्ञासा उत्पन्न होऊन त्यासाठी प्रयत्न होऊ लागतील
अन्यथा परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः अशी निराशाजनक स्थिती ओढवेल म्हणजे परब्रह्म विषयक , त्यासंबंधीच्या ज्ञानाविषयी साहित्याविषयी मार्गाविषयी काहीही माहिती नसणे अशी स्थिती येईल
आपण आत्ता सध्या याच स्थितीच्या जवळपास आहोत
तेव्हा सावध ऐका पुढल्या हाका ...
आना है तो आ, राह में कुछ फेर नहीं है
भगवान के घर देर है, अन्धेर नहीं है
जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुये धंधे
भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे
खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा
जो तू नहीं कर पाया तो भगवान करेगा
कहने की ज़रूरत नहीं आना ही बहुत है
इस दर पे तेरा शीश झुकाना ही बहुत है
जो कुछ है तेरे दिल में वो सब उसको खबर है
बन्दे तेरे हर हाल पे मालिक की नज़र है
बिन मांगे भी मिलती हैं यहाँ मन की मुरादें
दिल साफ हो जिनका वो यहाँ आ के सदा दें
मिलता है जहाँ न्याय वो दरबार यही है
संसार की सबसे बड़ी सरकार यही है
The childhood is lost in attachment to games. The youth is lost in attachment to woman. Old age passes with worry and anxiety, thinking over many things. But there is hardly anyone who wants to be lost (attached) in para-braman, the Supreme Spirit.
बाल bāla — young boy;
तावत् tāvat — till then, till he is young;
क्रीडा krīḍā — play;
सक्त saktaḥ — attached, absorbed;
तरुण taruṇaḥ — young man;
तावत् tāvat — till then;
तरुणी taruṇī — young woman;
सक्त saktaḥ — attached, engrossed;
वृद्ध vṛddhaḥ — old man;
तावत् tāvat — till then;
चिंता cintā — worry;
सक्त saktaḥ — attached, absorbed;
परमे parame — high, supreme;
ब्रह्मणि brahmaṇi — brahman, spirit, God;
कोsपि ko’pi — whosoever;
न na — not;
सक्त saktaḥ — attached, engrossed.
त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।
🙏🏼
वैद्य हृषीकेश म्हेत्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा