॥ ॐ ॥
卐 ॥ भज गोविंदम् ॥卐
श्लोक १०
वयसि गते कः कामविकारः
शुष्के नीरे कः कासारः ।
क्षीणे वित्ते कः परिवारः
ज्ञाते तत्त्वे कः संसारः ॥ १० ॥
वयसि गते : तरुण वय निघून गेल्यावर
कः कामविकारः : कसली कामवासना
शुष्के नीरे : पाणी आटून गेल्यावर
कः कासारः : कसलं सरोवर
क्षीणे वित्ते : : पैसे नसतील तर
कः परिवारः : कुठले नातेवाईक
ज्ञाते तत्त्वे : एकदा तत्त्वज्ञान झाले कि
कः संसारः : मग कसला प्रपंच
तारुण्य संपले कि कामवासना ही व्यर्थ आहे.
उर्वशी उर्वशी हे प्रभुदेवाचं मुकाबला मधलं गाणं "30 उमर का जो है खेल, 60 में खेल के होगा क्या ?", या वाक्याने संपतं !!! कारण त्या वयात जोडीदाराला तुम्ही आकर्षक वाटत नाही आणि कामक्रीडा सक्षमपणे करून त्यातील आनन्द उपभोगता येईल इतकी शारीरिक क्षमता ही नसते.
पाणी सुकून आटून गेले असेल तर सरोवर हे नुसता एक खड्डा असते. ते निष्प्रयोजन होते.
जवळचा पैसा संपुष्टात आला, अपुरा पडू लागला की गणगोत नातेवाईक तोंड फिरवतात, अनोळखी होतात, काढता पाय घेतात. असतील शिते, तर जमतील भुते !!!
असे व्यतिरेकाने 3 बाबींची निरर्थकता सांगितल्या नन्तर, त्याच चालीवर , तत्त्वज्ञान लाभल्यानंतर, संसार कसा निरर्थक वाटू शकतो ते दर्शवले आहे !!
याचा अर्थ तत्त्वज्ञान लाभले कि संसार सोडून कर्तव्यपूर्ती न करता पळून जायचं, असा त्याचा अर्थ नाही. उलट तत्त्वज्ञान लाभाने प्रपंच करत असतानाही तो कर्तव्यबुद्धीने करता येऊ लागतो, इतरांकडून अपेक्षा ठेवणे सोडता/टाळता येते. अपेक्षा नसेल तर अपेक्षाभंगाचे दुःख नाही. समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार असं आधी स्वतःला समजावलं , तर मग तो अपेक्षेप्रमाणे नाही वागला तर, दुःख होत नाही आणि चुकून तो आपल्या अपेक्षेप्रमाणे वागलाच, तर मग बोनस!! सुखद धक्का !!!
Forget , forgive & ignore या 3 पैकी एकात समोरचा प्रत्येक व्यक्ती/घटना बसवता येते, जर तत्त्वज्ञान लाभले असेल तर!!! ते नसेल तर मग अपेक्षा अधिकार मान मानभंग दुःख निराशा उद्वेग क्रोध संताप शोक वैफल्य अशा अनेक नकारात्मक भावनांना सामोरे जावे लागते!!
समोरचा व्यक्ती चुकला असेल किंवा अगदी ठरवून मुद्दाम आपल्याला प्रतिकूल अप्रिय असं वागत असेल , तरीही मनाची शांती ढळून, त्यातून उद्भवणाऱ्या शोक क्रोध या पोटी स्वतःला शिक्षा करून घेणे, हे अगतिकतेचे असहाय्यतेचे लक्षण होय.
समोरचा व्यक्ती आपल्या पेक्षा लहान असेल व आपल्याला प्रिय/संबंधी असेल, तर तुम्ही मोठेपणा घेऊन forgive क्षमा करा !! क्षमा या शब्दाचा अर्थच सहन करणे tolerance endurance आहे.
समोरची व्यक्ति आपल्यापेक्षा मोठी आहे आणि आपल्याला प्रिय/संबंधी असेल तर तुम्ही लहानपणा नम्रपणा घेऊन forget करा, विसरून जा, सोडून द्या !! कारण तो व्यक्ती तुम्हाला हवाय, आदरणीय आहे म्हणून ...
विसरून जाणे हे एक वरदान आहे. सगळंच लक्षात राहिलं तर माणसाला वेड लागेल!!!
काय विसरायचं हेही ठरवता आलं पाहिजे!
ज्या स्मृतीचा जीवनात कधीही कसलाही सकारात्मक विधायक रचनात्मक उपयोग होणार नाही ते विसरून जावे.
मनात ठेवू नये. धरून बसू नये. आपलं मन, आपलं हृदय, आपला मेंदू, आपली विचारशक्ती ही डस्ट बिन 🗑️ (कचरापेटी) नसून , तो अशा नकारात्मक बाबींसाठी flush tank (फ्लश)🚽 आहे हे जाणावे
गोष्टी/प्रसंग/घटना/भावना/मत/प्रतिक्रिया या इतर कुण्णालाही सांगणं शक्य नसेल आणि त्या गोष्टी मनातून जातच नसतील तर ... त्या लिहून काढाव्यात✍🏼 ... pen down ... किंवा मोबाईल मध्ये note, google keep, word, doc यात लिहा किंवा voice type करा किंवा voice message रेकॉर्ड करा... थोडक्यात काय, तर ... व्यक्त व्हा ... मनातले, त्या गोष्टीबाबत अतिशय वेगाने होणारे , पिच्छा न सोडणारे, सतत घोंगवणारे विचार, तुम्ही एकदा स्वतःशीच लिहायला/बोलायला लागलात, कि त्यांचा वेग खूपच कमी होतो. कारण आधी ते अनियंत्रित असतात, विस्कळित असतात... तुम्ही त्यांना लिहितो बोलतो म्हणजे शब्दबद्ध करतो म्हणजे व्यवस्थित करतो, आवरतो organise करतो असं ठरवलं कि त्याक्षणी त्यांचा वेग लक्षणीय रीत्या घटतो. आणि मग लिहिलेले बोललेले पुन्हा एकदा वाचले ऐकले कि, आपण किती क्षुल्लक क्षुद्र trivial बाबीत अडकून पडलो होतो, हे उमगते आणि स्वतःचेच हसायला येते.
मुख्य म्हणजे या स्वसंवाद स्वरूप व्यक्त होण्याने मनाचे डस्ट बिन🗑️ न होता ... flush🚽 होते
आणि शेवटचे म्हणजे ignore दुर्लक्ष करणे !!! समोरचा व्यक्ती जर आपल्याशी संबंधित नसेलच तर , त्याच्या वर्तनाकडे त्या घटनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. आपण चिडलो प्रतिक्रिया reaction दिली की त्या व्यक्ती/कृती/घटना याला आपल्या दृष्टीने महत्त्व आहे , असे होते. चिडणाऱ्या व्यक्तीला चिडवायला मजा येते. समोरचा चिडला नाही तर चिडवणाराची खुमखुमी संपते त्याची जिरते
आणि ignorance is the best insult ... दुसऱ्याला खिजगणतीतही न धरणे म्हणजे केवढा भयंकर अपमान!!!
आपण react rebounce प्रतिक्रिया उसळी असे करण्यापेक्षा नियंत्रित प्रतिसाद controlled response द्यावा. आणि तो रिस्पॉन्स null शून्य म्हणजे दुर्लक्ष उपेक्षा असा असेल, तर समोरच्या व्यक्तीचा/कृतीचा/घटनेचा अनिष्ट अप्रिय नुकसानकारक परिणाम आपल्यावर होत नाही.
हे सगळं सांगणं लिहिणं वाचणं जितकं वेळखाऊ व अवघड आहे त्यापेक्षा ते आचरणात आणणे कितीतरी जास्त सहजसोपे आहे.
करून तर पहा 🙂
अनेक ब्रेकप , जॉब लॉस , पतिपत्नी वाद, सासूसून conflict, M W गुंता यात सापडलेल्या त्रस्त पेशन्टना , या आमच्या समुपदेशन पद्धतीचा उपायांचा लाभ होत आलेला क्लिनिक मध्ये नित्य अनुभवले आहे
पण हे सगळं सहजसाध्य होण्यासाठी थोडंसं तत्त्वज्ञान हवंच
तेच तत्त्वज्ञान जीवनमुक्ती कडे नेणारे असते
जीवनातील अनेक समस्या अडचणी पूर्वग्रह अपसमज यातून मुक्ती हीसुद्धा अल्पशी म्हणजे आंशिक जीवनमुक्ती आहे
त्यासाठी वरील प्रकारचे संयम क्षमा शांती उपेक्षा असे प्राथमिक तत्त्वज्ञान आवश्यक !!!
आणि जे अंतिम मोक्ष कैवल्य या स्वरूपाचे जीवनमुक्ती म्हणजे जिवंतपणी मुक्तीचा अनुभव येण्यासाठी उच्च कोटीचे तत्त्वज्ञान आवश्यक
प्रारंभ हा अल्प आंशिक मुक्तितून करू या
दुसरों की जय से पहले खुद को जय करे ।
संसार प्रपंच व्यवहार असणारच आहे!
कारण हा देह व हे जीवन हे प्रारब्ध भोग संपवण्यासाठी मिळालंय, ते भोग संपेपर्यंत या देहातून, जीवनातून पुढची गती नाही. फक्त पुढची गती काय असावी, याचा विकल्प तुमच्या संकल्पाने निश्चयाने दृढ आचरणाने तुम्हीच ठरवू शकता, जर त्या स्तरावरचे तत्त्वज्ञान लाभले व आचरले असेल तर ...
खुदी को कर बुलंद इतना कि
हर तकदीर से पहले
खुदा खुद बंदे से पूछे कि तेरी रजा क्या है
क्रियमाण म्हणजे आपण रोज करत असलेले कर्म.
संचित म्हणजे आजपर्यंत सर्व जन्मात/देहात केलेली साठलेली कर्मे.
प्रारब्ध म्हणजे या देहासाठी/ या जीवनाची कर्मक्षय कर्मोपभोग होण्यासाठी, संचित कर्मे मधून, देवाने/नियतीने निवडून नेमून दिलेली कर्मे!
आजच्या क्रियमाण मधून असं करा कि, पुढचं प्रारब्ध हे शीघ्र कर्म क्षय कारक होऊन, संचिताचाही लोप होईल आणि कर्माच्या खात्यात काहीच शिल्लक न राहून मोक्ष लाभेल !!!
What good is lust when youth has fled?
What use is a lake which has no water?
Where are the relatives when wealth is gone?
What is saṁsāra (transmigratory process), when Truth is known
वयसि — youth, young age;
गते — when gone;
क: — who, where, what use;
कामविकार: — passion, sexual attraction;
शुष्के — dried up of;
नीरे — water;
कः — what use is the;
कासारः — lake;
क्षीणे — reduced, spent-up, gone;
वित्ते — wealth, money;
कः — what use for;
परिवारः — family, dependants;
ज्ञाते — knowledge, in the realised state;
तत्त्वे — truth, essence;
कः — what is the use;
संसारः — circle of birth and death, of worldly existence.
त्वदीय वस्तु गोविंद
तुभ्यम् एव समर्पये ।
तेरा तुझको अर्पण
क्या लागे मेरा ।
श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु ।
🙏🏼
वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा