भज गोविंदम्' हे जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले
काव्य आहे. लौकिक अर्थाने हे कोण्या देवतेचे स्तोत्र
नसून ही एक छोटीशी रचना आहे. ताला सुरावर भजन
म्हणून ते गायले गेले असले तरी त्यात वेदांताचे सार
आहे आणि त्यात मनुष्याला एक विनवणी केली आहे
की, विचार कर.... मी इथे या जीवनात का आहे? मी
संपत्ती, कुटूंब एकत्र करीत आहे, परंतु मनाला शांतता
का लाभत नाही? सत्य काय आहे? जीवनाचा हेतू काय
आहे? अशा प्रकारे विचार जागृत केलेली व्यक्ती दैवी
तत्त्वाकडे परत वळते. आचार्यांचे शब्द खूपच भेदक व
कठोर वाटतात आणि त्यात मुक्ती प्राप्त करण्याचे एक
निश्चित तत्वज्ञान आहे.
या रचनेच्या मुळाशी एक घटना आहे. आदि
शंकराचार्यांच्या काशी मुक्कामात त्यांना गंगातीरी
पाणिनीय संस्कृत व्याकरणाचा अभ्यास करणारा एक
वृद्ध दिसला. त्याची केवळ बौद्धिक कसरतीची चाललेली
दुर्दशा पाहून आचार्यांना कीव वाटली की, आयुष्याच्या
या वळणावर व्याकरणापेक्षा प्रार्थना आणि मनावर
नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ घालवणे हे अधिक चांगले.
जगातील बहुसंख्य लोक ईश्वरी चिंतनाऐवजी केवळ
बौद्धिक, इंद्रिय सुखात व्यग्र आहेत. हे पाहून त्यांना 'भज
गोविंद' हे उपदेशपर काव्य स्फुरले. ३१ श्लोकांमध्ये ते
आपल्या चुकीच्या गोष्टी, जीवनाबद्दल आपला चुकीचा
दृष्टीकोन स्पष्ट करतात आणि आपले अज्ञान आणि भ्रम
दूर करतात.
'भज गोविंदम्' मूलतः ‘मोहम्-उद्गार' - भ्रम दूर करणारे
(काव्य) म्हणून ओळखले जात असे. या काव्यात
आचार्यांनी चांगलीच कान उघाडणी केली आहे की,
संपत्ती गोळा करणे, वासनापूर्ती यासारख्या गोष्टी
निरुपयोगी व क्षुल्लक आहेत. त्यामध्ये आपला वेळ
घालवण्याऐवजी वास्तव आणि अवास्तव, अचल-चल,
स्थिर-चंचल, सार्वकालिक -क्षणिक यांच्यातील फरक
जाणून घेण्यासाठी ज्ञान जोपास. आत्म-ज्ञाना व्यतिरिक्त
इतर सर्व ज्ञान निरुपयोगी आहे. आपल्या सांसारिक
अस्तित्वाचा हेतू गोविंदाचा शोध घेणे आणि त्याला
प्राप्त करणे हाच असला पाहिजे. आचार्यांचे हे मार्गदर्शन
मानवी त्रासांच्या स्वरूपाविषयी जागरूकता, या त्रासांची
कारणे, त्यांच्या निराकरणाचे मार्ग व चिरंतन आनंदाची
अवस्था असे आहे.
'भज गोविंदम् चे द्वादशमंजरिका स्तोत्रम आणि
चतुर्दशमंजरिका स्तोत्रम असे दोन भाग पडतात. असे
म्हणतात की, पहिला श्लोक रचल्यानंतर भज गोविंदम् चे पुढील १२ श्लोक आचार्यांना स्फुरले. म्हणून श्लोक २-१३ यांना द्वादशमंजरिका स्तोत्रम् म्हणतात.
आचार्यांच्या उत्स्फूर्त पठणातून प्रेरित होऊन, त्यांच्या १४ शिष्यांपैकी प्रत्येकाने एक श्लोक रचला.या संकलनाला
चतुर्दशमंजरिका स्तोत्रम् असे म्हणतात. परंतु या
श्लोककर्त्यांसाठी सांगोवांगी कथांखेरीज दुसरा आधार नाही. शेवटी आचार्यांनी स्वतःचे पाच श्लोक जोडूनश्लोकांची एकूण संख्या ३१ केली.या ३१ श्लोकांना 'मोहमुद्गरः' (अज्ञानावर घातलेला घण/हातोड्याचा घाव/प्रहार ) असेही म्हटले जाते. त्यालाच
द्वादशमंजरिका आणि चतुर्दशमंजरिका असेही नाव
आहे.
भजन या स्वरूपात असल्याने त्याची रचना कोणा एका वृत्तात केलेली नाही.
भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढमते ।
संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा