ॐ

卐 भज गोविंदम् 卐

श्लोक ११

मा कुरु धनजन यौवन गर्वं

हरति निमेषात्-कालः सर्वम् |

मायामयमिदम्-अखिलं हित्वा

ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा ‖ ११ ‖


मा = नको

कुरु = करू/बाळगू

धनजन यौवन गर्वं = स्वतःकडील संपत्ती, माणूसबळ/नातेसंबंध/contacts, स्वतःचे तारुण्य/शरीरसामर्थ्य याबद्दल अभिमान दंभ 


हरति = काढून घेतो

निमेषात् = एक क्षणात

कालः = काळ/वेळ/नियती

सर्वम् = सगळं


मायामयम् = मायेने बनलेले , भासमान

इदम् अखिलं = हे सगळं/सम्पूर्ण

हित्वा = सोडून

ब्रह्मपदं = ब्रह्मज्ञान यामध्ये

त्वं = तू

प्रविश = प्रवेश कर

विदित्वा = जाणीवपूर्वक


स्वतःच्या संपत्तीचा , स्वतःच्या नातेसंबंधांचा , स्वतःच्या तारुण्याचा (तारुण्यसुलभ शारीरिक सामर्थ्याचा ) अभिमान दंभ बाळगू नये. Don't have pride about money men muscle


हे सगळं एका क्षणात तुमच्याकडून हिरावून घेण्याची शक्ति काळामध्ये आहे


याची अनुभव अनेकांनी आताच्या कोरोना काळात घेतलाय. कितीही पैसा व ओळखी असल्या तरीही साधं बेड मिळवता आलेलं नाही अनेकांना हॉस्पिटलमध्ये


अत्यन्त तरुण वय व धडधाकट दिसणारं शरीर असूनही कित्येक जण यमसदनी गेलेत


सगळं सम्पत्ती सामर्थ्य आणि संपर्क इथंच राहून गेलं त्यांचं !!


याचाच अर्थ हे सगळं दिखाव्यापुरतंच आहे म्हणजे ही सगळी भासमान अशी माया आहे


कठीण समय येता कोण कामास येतो?

धन जन यौवन यातलं काहीही उपयोगी पडलं नाही


म्हणूनच ज्याचा आपल्याला खूप अभिमान अहंकार दर्प दंभ असतो, ते खरंतर सगळं भासमान होय


म्हणून 50-60-70 या वयात तरी हे मायाजाल प्रत्यक्षात किंवा तत्त्वतः म्हणजे भावनात्मक रीत्या तरी सोडून देऊन, शाश्वत अशा तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान याचा मार्ग धरला पाहिजे


यज्ञ दान उपास/उपवास तप तीर्थयात्रा हे सगळं कृत/सत्य त्रेता द्वापार या युगांत शक्य/योग्य होतं


आता कलियुगात मात्र नामस्मरण हेच भवतारक आहे म्हणून तर सर्वश्रेष्ठ उपदेश भज गोविंदम् हाच होय


शास्त्राभ्यास नको श्रुति पढुं नको तीर्थासि जाऊं नको । 

योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ।

काळाचे भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ।

ज्याचीया स्मरणें पतित तरती तो शंभु सोडू नको ॥


शंभु आणि गोविंद एकच

शिव आणि विष्णु एकच


मया पुराणोपपुराणयुक्ता ।  

साङ्गाश्च वेदा: स्मृतय: स्मृता: ।। 

शास्त्राणि सर्वाणि विलोकितानि ।

न क्वापि दृष्ट: शिवविष्णुभेद ।।


पुराण, उपपुराण, वेदांगे, वेद, स्मृति ग्रंथ, दर्शन शास्त्रे या सर्वांचे अवलोकन/अध्ययन केल्यानंतरही कुठेही शिव व विष्णू या दोहोंत भेद/भिन्नत्व प्रतिपादन केलेला नाही. 


ॐ नमः शिवाय आणि राम कृष्ण हरि किंवा हरे राम हरे कृष्ण किंवा श्रीराम जयराम जय जय राम हे सर्व एकसमानच आहे


Do not take pride in wealth, friends and youth. Each one of these is destroyed within an instant by Time. Free yourself from the illusion of the world of māyā and attain the realm of brahman, timeless truth


मा — don’t, do not; 

कुरु — do act; 

धन — wealth, money; 

जन — people; 

यौवन — youth; 

गर्वम् — arrogance, pride; 

हरति — steals, takes away; 

निमेषात् — in the twinkling of the eye, instant; 

काल:  — Master Time; 

सर्वम् — all; 

माया — illusion, delusion; 

मयम् — full of, completely filled; 

इदं — this; 

अखिलम् — whole, entire; 

हित्वा — abandoned, having given up; 

ब्रह्मपदम् — realm of brahman, spiritual truth; 

त्वं — you; 

प्रविश — enter; 

विदित्वा — having known, realised.


त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु  ।


🙏🏼

वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२