भज गोविंदम्

।। श्लोक 2 ।।


मूढ जहीहि 

धनागमतृष्णाम् , 

कुरु सद्बुद्धिं 

मनसि वितृष्णाम् ।

यत् लभसे 

निजकर्मोपात्तम्, 

वित्तं तेन 

विनोदय चित्तम् ॥ ०२॥


मराठी :

अरे वेड्या, संपत्ती गोळा करत राहण्याच्या लालसेला

दूर सार. 

आपल्या मनात चांगले विचार करून

सतत काहीतरी मिळवत राहण्याच्या इच्छेपासून मुक्तता मिळव. 

तुझ्या कर्मानुसार जे धन

तुला मिळते ,

त्यातच आपल्या मनाचे समाधान मान.



मूढ हा मुह् (मोह) यापासून बनलेला भूतकाळ वाचक शब्द आहे

मुग्ध मोहित हे ही तसेच शब्द होत


मोहः कार्याकार्यानभिज्ञत्वम्।

मोह म्हणजे काय करावे , काय करू नये, याचा निर्णय घेता न येणे अशी अवस्था.

गंमतीने मी मोह शब्दाची व्याख्या/definition ही रंगीला चित्रपटातील गाण्यात आहे, असं सांगतो ... क्या करे क्या ना करे , ये कैसी मुश्किल हाय 😊


अर्जुनाला पहिल्या अध्यायात मोह झाला होता

म्हणून शेवटच्या अध्यायात तो स्वतः मान्य करतो कि नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा ।


मोह याचा सध्याच्या मराठीत जो अर्थ होतो, तो खरंतर लोभ आहे.


तर मूढ याचा व्यावहारिक सम्बोधन या दृष्टीने अर्थ मूर्ख वेडा असा आहे


जसे अंतकाळी कृ म्हणजे करणे हे व्याकरण शिकण्यापेक्षा भज गोविंदम् असं ईशभजन नामस्मरण करणे हेच हितावह आहे

तसेच जीवनात विविध काळात आपण कोणत्या नको त्या बाबींना अकारण प्राधान्य अग्रक्रम (preference/ priority) देतो आणि भगवद्भक्ती कशी आपण विलंबित (postpone) करत राहतो त्याची उदाहरणे देताना हा श्लोक आला आहे


मूढ जहीहि 

धनागमतृष्णाम् ।


'अर्था'तच जगण्यात 'अर्थ' आहे किंवा सबसे बडा रुपैय्या यानुसार प्रत्येक मनुष्य धनसंपत्तीचा यथाशक्य अधिकाधिक संचय करण्यासाठी अविरत धडपडत असतो


अर्थ मूलौ हि धर्म कामौ किंवा पैसा सबकुछ तो नहीं है, पर बहुत कुछ है, या समजुतीने जीवनभर माणूस पैसे मिळवत राहतो


इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्।


इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्।।


आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया।


यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः।।


धन आगम तृष्णा ही निरंतर असतेच

पण त्यासोबतच "मी किती मोठा यशस्वी आनंदी दानशूर लोकप्रिय आहे" हे दाखवण्याची/प्रदर्शन करण्याची मनुष्यमात्राला खूप हौस असतेच. कौतुकाची आस प्रत्येकाला असते


म्हणून तर सोशल मीडियाचा जन्म व अल्पावधीतच इतका प्रसार झाला नं?


कुरु सद्बुद्धिं 

मनसि (कुरु) वितृष्णाम् ।


चांगली बुद्धी बाळगावी

वितृष्णा = विगता तृष्णा

सतत मिळवत राहण्याच्या शर्यतीतून बाहेर यावे

Keep yourself away from the "rat race of achievements"


पैसा प्रसिद्धी हे मिळवत राहण्याच्या सोस (धन आगम तृष्णा) कुठंपर्यंत ताणायचा, हे कळलं पाहिजे


कुठं थांबायचं, हे ठरवता आलं पाहिजे.

थांबता नाही आलं, तरी विशिष्ट वयानंतर; टॉप गियर वरून आता थोडं कमी स्पीडमध्ये जीवनाची गाडी हाकायला हवी, याचं भान येणं आणि त्याप्रमाणे संयम ठेवून आचरण करता येणं आवश्यक असते


यत् लभसे 

निजकर्मोपात्तम्, 

वित्तं तेन 

विनोदय चित्तम् ॥


निज = स्वतःचे 

कर्म = स्वीकृत / विहित कर्म किंवा पूर्वकर्म , नशीब

यानुसार (उपात्त) जितकं मिळेल, 

तेवढ्या पैशाने मनाला (विनोदय) समजावता आलं पाहिजे, आनंदी ठेवता आलं पाहिजे


जे वित्त म्हणजे धन म्हणजे संपत्ती म्हणजे पैसा आपल्या कर्मानुसार लाभत आहे , प्राप्त होत आहे , मिळत आहे ; त्यात आनन्द समाधान संतोष तृप्ती मानली पाहिजे मानता आली पाहिजे. 


विनोद या शब्दाचा अर्थ आपण हसण्याजोगी गोष्ट असा घेतो प्राय:.

वि + नोद असं आहे

नुद् गति प्रेरणा push drive


मूढ जहीहि 

धनागमतृष्णाम् , 

यत् लभसे 

निजकर्मोपात्तम्, 

वित्तं तेन 

विनोदय चित्तम् ॥


O fool! Give up your thirst to amass wealth, devote your mind to dispassion and thoughts of the Real. Be content with what comes to you through actions performed by your own work.


mūḍha — fool, dull-minded person, one who comes to suffer from one’s own ignorance; 


jahīhi — give up, abandon; 


dhana — wealth; 


āgama — coming; 


tṛṣṇāṁ — thirst, desire; 


kuru — do, act;


sad-buddhiṁ — good awareness; 


manasi — in the mind; 


vitṛṣṇām — desirelessness, dispassion; 


yallabhase — whatever you obtain; 


nijakarmopāttaṁ — obtained through one’s own work; 


vittaṁ — wealth; 


tena — by that; 


vinodaya — be content with; 


cittam — mind.


🙏🏼

वैद्य हृषीकेश म्हेत्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२