भज गोविंदम् ।

श्लोक 5


यावद्-वित्तोपार्जन सक्तः

तावन्-निजपरिवारो रक्तः |

पश्चाज्जीवति जर्जर देहे

वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ‖ 5 ‖


यावद् = जोपर्यंत, जोवर

वित्तोपार्जन = धनार्जन, पैसे मिळवणे

सक्तः = व्यग्र, गुंतलेला, रत, busy

पाठभेद शक्त: = समर्थ, सक्षम

तावत् = तोपर्यंत, तोवर

निजपरिवारो = (त्याचे) स्वतःचे कुटुंब परिवार

रक्तः  = अनुकूल, प्रेम करणारे, रस असणारे


पश्चात् = त्यानंतर मात्र, धनार्जन क्षमता सम्पल्यावर कमी झाल्यावर

जीवति = जगतो , जीवन कंठतो, दिवस काढतो

जर्जर = म्हाताऱ्या, वृद्ध, खिळखिळ्या

देहे = शरीरात शरीराने

वार्तां = ख्यालीखुशाली क्षेमकुशल चौकशी दखल

कोऽपि = कुणीही

न पृच्छति = विचारत नाही

गेहे = घरामध्ये घरामधील


जोपर्यंत माणूस संपत्ती/पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे, तोपर्यंतच त्याच्या सभोवतालचे सर्व कुटुंबीय आपुलकी प्रेम काळजी करतात. परंतु जेव्हा त्याचे शरीर म्हातारपणामुळे तो खचते, तेव्हा मात्र घरी कोणीही त्याची काळजी करत नाही, त्याच्याशी एक शब्द देखील बोलत नाही, विचारपूस करत नाही


अतिशय विदारक असे कटू सत्य शंकराचार्य सांगत आहेत कि जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे , तोपर्यंतच समाजात आणि स्वतःच्या घरात तुम्हाला मान स्थान आहे.


हेच अगस्ति कृत लक्ष्मी स्तोत्रातही आहे 


पाण्डित्यं शोभते नैव न शोभन्ति गुणा नरे ।

शीलत्वं नैव शोभते महालक्ष्मि त्वया विना ॥


धन नसेल तर पांडित्य सद्गुण शील यांना शोभा/सन्मान/महत्त्व नाही


तावद्विराजते रूपं तावच्छीलं विराजते ।

तावद्गुणा नराणां च यावल्लक्ष्मीः प्रसीदति ॥


माणसाचे रूप शील गुण हे धन आहे तोवरच मान्यता पावतात


लक्ष्मित्वयालंकृतमानवा ये 

पापैर्विमुक्ता नृपलोकमान्याः ।

गुणैर्विहीना गुणिनो भवन्ति 

दुशीलिनः शीलवतां वरिष्ठाः ॥


ज्यांच्याकडे धन आहे ते लोक, (पापी असले तरी) पापरहित, राजमान्य, लोकमान्य, गुण नसले तरी गुणवान आणि शीलभ्रष्ट असले तरी सच्छील माणसांपेक्षा अधिक माननीय समजले जातात


लक्ष्मीर्भूषयते रूपं लक्ष्मीर्भूषयते कुलं ।

लक्ष्मीर्भूषयते विद्यां सर्वाल्लक्ष्मीर्विशिष्यते ॥


पैसा हाच रूप कुल विद्या यांचे भूषण आहे, 

या सर्वांपेक्षा पैसा हाच श्रेष्ठ आहे


काळ कोणताही असो, प्राचीन किंवा आधुनिक पैसा हाच व्यवहारात श्रेष्ठता ठरवण्याचे मानक आहे. 

हे लौकिक सत्य शंकराचार्य यांच्या काळात, त्याआधी महाभारत काळात आणि आजही तसेच अबाधित आहे


म्हणूनच जीवनाच्या पडत्या उतरत्या अंतिम काळात धन राखून यावज्जीव धन आपूर्ती होईल याची व्यवस्था करून, धनाप्रमाणेच आपल्याला शाश्वत चिरंतन सुखाची निरंतर उपलब्धि करून देऊ शकणाऱ्या भगवद्भक्तीची वाट चोखाळावी कास धरावी


तरच अनायासेन मरणम् ... पुरेसे धन नसेल तर उपचाराविना हाल अपेष्टा होऊन मरण येईल 


विना दैन्येन जीवनम् ... पुरेसे धन गाठीला असेल तर आपल्या तत्कालीन गरजांसाठी इतरांकडे हात पसरण्याची , दीनपणाची , परावलंबित्वाची, अपमानाची, अवहेलनेची, उपेक्षेची, दुर्लक्षिले जाण्याची वेळ येत नाही


देहान्ते तव सान्निध्यम् ... पुरेसे धन सोबत असेल तर विवंचना रहित शांत तृप्त मनाने हरिभक्ति करणं निश्चितच शक्य होईल. उपाशीपोटी परमार्थ शक्य नाही. संतोष समाधान तृप्ती कृतकृत्यता असेल तरच निवांत चित्त हे देवाचे चरणी लीन होऊ शकते


भज गोविंदम् ।।


भज गोविंदम् या सन्मार्गावर पुढील जीवनप्रवास करावा


So long as a man is fit and able to support his family by earning wealth, all those family members around him show affection. But no one at home cares for him, even have a word with him, when his body becomes invalid and totters due to old age


yāvad — so long as;

vitta-upārjana — earning wealth, acquisition of property; 

Śaktaḥ — able, capable of; 

stāvannija — till then, that much; 

parivāro — own family members; 

raktaḥ — attached;

paścāt — later, after;

jīvati — while living, lives without earning; 

jarjara — old, decrepit, decayed, infirm; 

dehe — in the body;

vārtāṁ — news, information; 

ko’pi — whosoever, even one; 

na — not; 

pṛcchati — inquires, asks; 

gehe — in the house, at home.


त्वदीय वस्तु गोविंद तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाऽर्पणम् अस्तु  ।

🙏🏼

वैद्य हृषीकेश म्हेत्रे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२