पोस्ट्स

इमेज
 ॐ 卐 भज गोविंदम् 卐 श्लोक ११ मा कुरु धनजन यौवन गर्वं हरति निमेषात्-कालः सर्वम् | मायामयमिदम्-अखिलं हित्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा ‖ ११ ‖ मा = नको कुरु = करू/बाळगू धनजन यौवन गर्वं = स्वतःकडील संपत्ती, माणूसबळ/नातेसंबंध/contacts, स्वतःचे तारुण्य/शरीरसामर्थ्य याबद्दल अभिमान दंभ  हरति = काढून घेतो निमेषात् = एक क्षणात कालः = काळ/वेळ/नियती सर्वम् = सगळं मायामयम् = मायेने बनलेले , भासमान इदम् अखिलं = हे सगळं/सम्पूर्ण हित्वा = सोडून ब्रह्मपदं = ब्रह्मज्ञान यामध्ये त्वं = तू प्रविश = प्रवेश कर विदित्वा = जाणीवपूर्वक स्वतःच्या संपत्तीचा , स्वतःच्या नातेसंबंधांचा , स्वतःच्या तारुण्याचा (तारुण्यसुलभ शारीरिक सामर्थ्याचा ) अभिमान दंभ बाळगू नये. Don't have pride about money men muscle हे सगळं एका क्षणात तुमच्याकडून हिरावून घेण्याची शक्ति काळामध्ये आहे याची अनुभव अनेकांनी आताच्या कोरोना काळात घेतलाय. कितीही पैसा व ओळखी असल्या तरीही साधं बेड मिळवता आलेलं नाही अनेकांना हॉस्पिटलमध्ये अत्यन्त तरुण वय व धडधाकट दिसणारं शरीर असूनही कित्येक जण यमसदनी गेलेत सगळं सम्पत्ती सामर्थ्य आणि संपर्क इथं...
इमेज
 ॥ ॐ ॥ 卐 ॥ भज गोविंदम् ॥卐 श्लोक १० वयसि गते कः कामविकारः शुष्के नीरे कः कासारः । क्षीणे वित्ते कः परिवारः ज्ञाते तत्त्वे कः संसारः ॥ १० ॥ वयसि गते : तरुण वय निघून गेल्यावर कः कामविकारः : कसली कामवासना  शुष्के नीरे : पाणी आटून गेल्यावर कः कासारः : कसलं सरोवर क्षीणे वित्ते : : पैसे नसतील तर कः परिवारः : कुठले नातेवाईक ज्ञाते तत्त्वे : एकदा तत्त्वज्ञान झाले कि कः संसारः : मग कसला प्रपंच तारुण्य संपले कि कामवासना ही व्यर्थ आहे. उर्वशी उर्वशी हे प्रभुदेवाचं मुकाबला मधलं गाणं "30 उमर का जो है खेल, 60 में खेल के होगा क्या ?", या वाक्याने संपतं !!! कारण त्या वयात जोडीदाराला तुम्ही आकर्षक वाटत नाही आणि कामक्रीडा सक्षमपणे करून त्यातील आनन्द उपभोगता येईल इतकी शारीरिक क्षमता ही नसते. पाणी सुकून आटून गेले असेल तर सरोवर हे नुसता एक खड्डा असते. ते निष्प्रयोजन होते. जवळचा पैसा संपुष्टात आला, अपुरा पडू लागला की गणगोत नातेवाईक तोंड फिरवतात, अनोळखी होतात, काढता पाय घेतात. असतील शिते, तर जमतील भुते !!! असे व्यतिरेकाने 3 बाबींची निरर्थकता सांगितल्या नन्तर, त्याच चालीवर , तत्त्वज्ञान लाभल्यानंतर, ...
इमेज
 卐 । भज गोविंदम् । 卐 । श्लोक ९ । सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् | निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ‖ 9 ‖ सत्सङ्गत्वे = चांगल्या संगतीमुळे निस्सङ्गत्वं = अलिप्तता निस्सङ्गत्वे = अलिप्ततेमुळे निर्मोहत्वम् = मोह नाश निर्मोहत्वे = मोह नाशामुळे निश्चलतत्त्वं = शाश्वत तत्त्व प्राप्ति निश्चलतत्त्वे = शाश्वत तत्त्व प्राप्ति मुळे जीवन्मुक्तिः = जिवंतपणी मुक्ती मोक्ष कैवल्य , संजीवन समाधि 🙏 चांगली संगत ही व्यक्तींची किंवा विचारांची असू शकते आजकालच्या जगात तर चांगली संगत ही सुदूर अंतरावरूनही लाभू शकते ऑनलाईन किंवा इंटरनेट हे साधन त्या अर्थाने वरदान होय. अनेक युट्यूब चॅनेल वर जो मनोबोध निरूपणाचा वरप्रसाद उपलब्ध आहे, तो अशाच सुदूर सत्संगतीचा उत्तम दाखला आहे अशा प्रत्यक्ष किंवा शाब्दिक किंवा ऑनलाइन अशा वैयक्तिक अथवा वैचारिक सत्संगतीमुळे प्रबोधन संभवते हे प्रबोधन अलिप्तता साधण्यास उपयोगी आहे प्रपंच सोडून परमार्थ नाही करायचाय उलट प्रपंच नेटका करून स्वीकृत कर्तव्यपूर्ती व तज्जन्य कृतकृत्यतेचे समाधान मिळवायचे आहेच पण ते मी केलं या अहंकाराने नव्हे तर भगवंताने ...
इमेज
 ॥卐 भज गोविंदम् 卐॥ ॥ श्लोक ८ ॥ आज थोडे बंडखोर हटके पचायला अवघड विचार !!! का ते कान्ता कस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः | कस्य त्वं वा कुत आयातः तत्वं चिन्तय तदिह भ्रातः ‖ ८ ‖ का : कोण ते : तुझी कान्ता : पत्नी कस्ते पुत्रः : कोण तुझा पुत्र संसारो अयम् : हा संसार हे जग  अतीव विचित्रः : अत्यंत विचित्र विलक्षण कस्य त्वं : तू कुणाचा वा : किंवा कुत आयातः : कुठून आला आहेस तत्वं चिन्तय तद् : या मूलभूत गोष्टींचा विचार कर इह : येथे आतातरी भ्रातः बंधो भावा भावड्या भैय्या कोण तुझी पत्नी? कोण तुझा पुत्र? हा संसार प्रपंच अत्यन्त विचित्र विलक्षण अनाकलनीय आहे! तू (स्वतः; खरंतर) कुणाचा आहेस? तू (मुळात) कुठून आला आहेस? या मूलभूत गोष्टींचा येथे आतातरी , या वयात तरी विचार कर!! आपले लग्न झाल्यापासून आपला जोडीदार व त्याच्यापासून उत्पन्न होणारी संतती यांनाच केंद्रस्थानी ठेवूनच प्रत्येक स्त्रीपुरुषाचे जीवन सुरू असते आपल्या लग्नापूर्वी हीच भूमिका आपले आईवडील निभावत असतात पिढ्यानुपिढ्या शतकानुशतके हेच सुरू आहे यात काही चुकीचं नाहीये,  समाजधारणेसाठी ही गृहस्थाश्रम नावाची उत्तरदायित्व स्वीकारणारी ...
इमेज
 भज गोविंदम्। श्लोक 7 बाल स्तावत् क्रीडासक्तः तरुण स्तावत् तरुणीसक्तः | वृद्ध स्तावत्-चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः ‖ 7 ‖ लहानपणी खेळण्यामध्ये वेळ दवडला जातो, तारुण्य हे स्त्रीविषयक किंवा पत्नी मुले या संसारविषयक गोष्टीतच  सरते, आणि वृद्धपणी नाना प्रकारच्या व्यर्थ चिंता करण्यात कालापव्यय होतो जिंदगी जब तक रहेगी फुरसत न मिलेगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्रीराम से हे वाक्य तुळशीबागेतील राममंदिरातून लक्ष्मी रस्त्याच्या द्वारातून बाहेर पडताना वरती लिहिलेले आहे (आता नूतनीकरण मध्ये नसेल राहिलं कदाचित) लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया वोही किस्सा पुराना है सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है ना हाथी है ना घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है किंवा बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर जन्म मरण नको आता, नको येरझार नको ऐहिकचा नाथा व्यर्थ बडिवार चराचरापार न्या हो, जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ही गाणी सर्वांना परिचित आहेतच आताच्या स्क्रीन (TV ...
इमेज
 ॥ भज गोविंदम् ॥ श्लोक 6 यावत्-पवनो निवसति देहे तावत्-पृच्छति कुशलं गेहे | गतवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये ‖6‖ यावत् = जोपर्यंत पवनो = श्वास (वायु) निवसति = निवास करत आहे देहे = शरीरात तावत् = तोपर्यंत पृच्छति = विचारपूस केली जाते कुशलं = क्षेमकुशल गेहे = घरात गतवति = निघून गेल्यानंतर वायौ = श्वास वायु देहापाये = देह पडल्यावर, मरण पावल्यावर भार्या = स्वतःची पत्नी देखील बिभ्यति = घाबरते तस्मिन् = त्या  काये = मृत शरीराला जोपर्यंत शरीरात श्वासोच्छ्वास सुरू आहे म्हणजे मनुष्य जिवन्त आहे (भले मग icu मध्ये व्हेंटिलेटरवर बेशुद्ध स्थितीत का असेना?!), तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या स्वास्थ्याबद्दल प्रेमळपणे विचारपूस करतात. पण जेव्हा जीवन-श्वास थांबतो आणि शरीर हे गतप्राण अवस्थेत प्रेतरूप होऊन अचेतन अवस्थेत पडते, तेव्हा त्याची स्वतःची पत्नी जिने जीवनभर साथ सोबत दिली आहे, ती सुद्धा त्या प्रेताला भीत असते. भज गोविंदम् हे भजन सूक्त निर्वाणसमय समीप आला असताना करून अतिशय स्पष्ट कठोर शब्दात करून दिलेली सत्याची जाणीव आहे विशेषतः जे 50-60-70 च्या वयात आहेत त्यांना जी...
इमेज
 भज गोविंदम् । श्लोक 5 यावद्-वित्तोपार्जन सक्तः तावन्-निजपरिवारो रक्तः | पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे ‖ 5 ‖ यावद् = जोपर्यंत, जोवर वित्तोपार्जन = धनार्जन, पैसे मिळवणे सक्तः = व्यग्र, गुंतलेला, रत, busy पाठभेद शक्त: = समर्थ, सक्षम तावत् = तोपर्यंत, तोवर निजपरिवारो = (त्याचे) स्वतःचे कुटुंब परिवार रक्तः  = अनुकूल, प्रेम करणारे, रस असणारे पश्चात् = त्यानंतर मात्र, धनार्जन क्षमता सम्पल्यावर कमी झाल्यावर जीवति = जगतो , जीवन कंठतो, दिवस काढतो जर्जर = म्हाताऱ्या, वृद्ध, खिळखिळ्या देहे = शरीरात शरीराने वार्तां = ख्यालीखुशाली क्षेमकुशल चौकशी दखल कोऽपि = कुणीही न पृच्छति = विचारत नाही गेहे = घरामध्ये घरामधील जोपर्यंत माणूस संपत्ती/पैसे मिळवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे, तोपर्यंतच त्याच्या सभोवतालचे सर्व कुटुंबीय आपुलकी प्रेम काळजी करतात. परंतु जेव्हा त्याचे शरीर म्हातारपणामुळे तो खचते, तेव्हा मात्र घरी कोणीही त्याची काळजी करत नाही, त्याच्याशी एक शब्द देखील बोलत नाही, विचारपूस करत नाही अतिशय विदारक असे कटू सत्य शंकराचार्य सांगत आहेत कि जोपर्यंत ...