Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi
संसर्गजन्य त्वचाविकार खरुज
संसर्गजन्य त्वचाविकार म्हणून खरुज हा आजार प्रसिद्ध आहे. घरात किंवा शाळेत एखाद्याला खरुज झाली की त्याचा प्रसाद हा इतरांना मिळतोच. खरुज या आजारास आयुर्वेदात पामा तर मॉर्डन सायन्समध्ये Scabies (स्कॅबिज) असे म्हणतात. या आजाराची सविस्तर माहिती जाणून पुढीलप्रमाणे ...
खरुज म्हणजे काय
खरुज हा परजीवी पासून पसरणारा एक त्वचाविकार आहे. हा परजीवी नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. एवढा सुक्ष्ण असतो. हा परजीवी मुनष्याच्या त्वचेत घुसतो. तेथे छोटा खड्डा तयार करतो किंवा छोटे छोटे बोगदे तयार करतो. आणि या ठिकामी मोठ्या संख्येने पसरतात. त्यामूळे तेथील त्वचा लालसर तपकिरी रंगाची छोट्या-छोट्या पुळ्या आलेली किंवा उंचावलेली अशी दिसते.
एखाद्या व्यक्तिस खरुज कशी होते
खरुज झालेल्या व्यक्तीच्या त्वचेचा संपर्क जर निरोगी माणसाच्या त्वचेसी झाला तर खरुज निरोगी व्यक्तिस होते. तसेच खरुज झालेल्या व्यक्तिचे कपडे, टॉवेल, बेडशीट, चादर किंवा इतर वस्तूंच्या संपर्काने देखील खरुज होते. अस्वच्छता, गलिच्छ वस्ती झोपडपट्ट्या, अति कोंदट जागा, कमी जागेत जास्त मनुष्यांचा वावर, खरुज झालेल्या व्यक्तीच्या घरातील फर्निचर आदींचा संपर्क आल्यांनतर निरोगी व्यक्तिस खरुज होते. कारण खरुजसाठी कारणीभूत होणारा हा परजीवी त्वचेच्या संपर्काशिवायही इतर वस्तू म्हणजे कपडे, फर्निचर आदींवर ४-५ दिवसापर्यंत जीवंत राहू शकतो. तसेच हा आजार लैगिंक संबंधातूनही पसरतो.
खरुजेची लक्षणे
मुख्यत: बोटांच्या बेचक्यात, तळहात, तळपाय, जांघेत छोटे-छोटे तांबूस रंगाच्या वेड्यावाकड्या रेषेमध्ये किंवा ठिपक्यांमध्ये उंचावल्यासारखे खड्डे असतात. यात प्रचंड प्रमाणात खाज असते. ही खाज रात्रीच्या वेळी आणखीनच वाढते. हे खाजविणारे बारिक फोड बाकीच्या भागावर म्हणजे बोटांच्या बेचक्यात, तळहाताच्या खाली नितंबावर, मांड्याच्या आतल्या बाजूवर पसरत जातात. चेहरा आणि डोके शक्यतो वाचते. म्हणजे खरुज चेहरा आणि डोक्यापर्यंत शक्यतो पोहचत नाही.
लहान मुलांमध्ये जेव्हा खरुज येते तेव्हा शरीराच्या मोठ्या प्रमाणात भाग व्यापते. लहान मुलांमध्ये खरुज चेह-यापर्यंत सुद्धा पोहचते. खाजविण्यामूळे चेह-यावर इसब झाल्यासारखे वाटते. तर हाता-पायावर पू ने भरल्यासारखे बारीक फोड येतात.खरुज अस्वच्छतेमूळे जरी होत असली तरीदेखील एखाद्या स्वच्छ मुनष्यास देखील खरुज होऊ शकते. अशा व्यक्तींमध्ये खरुज अगदी थोड्याच ठिकाणी येते.
प्रतिकारशक्ती कमी झाल्यास किंवा प्रतिकारशक्तीच्या संदर्भात काही आजार निर्माण झाल्यास देखील हा त्वचाविकार होऊ शकतो. अशा पेशंटमध्ये मात्र हे परजीवी एकाच भागावर मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या संख्येने गर्दी करुन राहतात. त्यामूळे त्या ठिकाणी खवड्यांच्या प्रमाणे दिसते. या रुग्णांमध्ये खरुज एकाच भागात मोठ्या प्रमाणात असली तरी त्यामानाने खाज फारच कमी असते. परंतु मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन असते.
खरुज या आजारात उपचार करतात कुटूंबातील ज्या-ज्या व्यक्तींना हा आजार झालेला आहे त्या-त्या व्यक्तींना एकाच वेळी सोबत उपचार चालू करावेत. स्वच्छता हे आजार बरे करण्याचे किंवा होऊ न देण्याचे मोठे साधन आहे. आपली प्रतिकारशक्ती चांगली असली म्हणजे शक्यतो कोणताच आजार होत नाही. किंवा झालाच तरी तो चटकन बरा होतो. यासाठी प्रतिकार शक्ती उत्तम असणे उत्तमच...!!!सदरची माहिती आपणाला कशी वाटली हे जरुर सांगा, अशाच प्रकारच्या आरोग्यदायी माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. सदरची माहिती कॉपी करण्यास सक्त मनाई आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा