sweet teast
गोड पदार्थ कधी खावेत? याचेही एक शास्त्र आहे. किंवा कोणत्या चवीचे पदार्थ कोणत्या क्रमाने खावेत? यालाही शास्त्रीय आधार आहे!
जेवणाचा आरंभ/ सुरुवात, ही गोड पदार्थांनी करावी जसे दूध तूप भात पोळी खीर श्रीखंड बासुंदी तूप गूळ तूप साखर!
जेवणाच्या मध्यभागात आंबट आणि खारट असे पदार्थ खावेत, जसे पापड लोणचे कढी दही ताक ...
तर कडू तिखट आणि तुरट हे पदार्थ जेवणाच्या शेवटी असावेत, जसे आमटी भात.
परंतु अगदी याच क्रमाने जेवण करता येते , असे नाही. उलट पोळी भाजीचे किंवा वरण भाताचे दोन तीन घास झाले की थोडसं लोणचं पापड चटणी कोशिंबीर असं खाल्लं की, रुची पालट होतो आणि पुन्हा पुढच्या घासासाठी नव्याने चव घेण्यासाठी जीभ ही तयार होते!!
दर दोन-चार घासानंतर थोडेसे पाणी प्यावे म्हणजे जणू तोंड रिंज rinse करावे , ज्यामुळे पुढच्या घासाचा स्वाद / चव ही पुन्हा नव्याने लागते. अन्यथा जर सलग 10 चमचे किंवा दहा बोटं श्रीखंड चाटून खाल्लं तर , पाचव्या सहाव्या चमच्या नंतर / बोटानंतर फक्त श्रीखंडाचा स्पर्श होऊ शकतो, पण त्याचा गोडवा/ त्याचा स्वाद/ त्याची चव, याचा आनंद येऊ शकत नाही .
परंतु तेच तिसऱ्या चौथ्या चमच्या नंतर/ बोटानंतर थोडसं पापड लोणचं चटणी असं खाल्लं तर, पुन्हा पुढच्या चमच्याला श्रीखंडाचा स्वाद गोडवा ही नव्याने जाणवते! आनंद देते !!
तर दोन-चार घासा नंतर थोडं थोडं सिप बाय सिप पाणी प्यावं म्हणजे जीभ तोंड स्वच्छ रिंज rinse होतं आणि पुढच्या घासासाठी पुन्हा जीभ ही स्वाद घेण्यासाठी चव घेण्यासाठी तयार असते.
प्रक्षालयेदद्भिरास्यं भुञ्जानस्य मुहुर्मुहुः ।
विशुद्धे रसने तस्य रोचतेऽन्नम् अपूर्ववत् ।।
स्वादुना तस्य रसनं प्रथमेनाऽतितर्पितम् ।
न तथा स्वादयेदन्यत्तस्मात् प्रक्षाल्यमन्तरा॥
अशितश्चोदकं युक्त्या भुञ्जानश्चान्तरा पिबेत् ।
तसेच
अत्यम्बुपानान्न विपच्यतेऽन्नं निरम्बुपानाच्च स एव दोषः |
तस्मान्नरो वह्निविवर्धनाय मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरि ||६३||
पिलेल्या पाण्याचेही पचन व्हावं लागतं
पीतं जलं जीर्यति यामयुग्माद्
यामैकमात्राच्छृतशीतलञ्च |
तदर्धमात्रेण शृतं कदुष्णं
पयःप्रपाके त्रय एव कालाः ||
एक याम म्हणजे 3 तास!!!
शरीर म्हणजे बेसिन नव्हे की, तोंडात पाणी टाकलं आणि खळखळा किडनीतने निघून गेलं; असं होत नाही.
आपण प्यायलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा आतड्यातून शरीरात शोषला जातो, रक्तासोबत तो संपूर्ण शरीरभर फिरतो आणि अतिशय जोर देऊन, प्रेशर देऊन , सामान्य बीपी पेक्षा ४० ने अधिक बीपी वाढवून, तो किडनीमध्ये रक्त गाळून, मूत्र या स्वरूपात पाणी शरीरातून बाहेर पडते. जगातली सर्वात चांगली किडनी सुद्धा, एका मिनिटाला एक मिली, एवढेच मूत्र तयार करू शकते म्हणजे 24 तासात चौदाशे चाळीस एम एल (1440ml) इतकंच मूत्र निर्माण होऊ शकतं !!!
त्यापेक्षा अधिक पिलेले पाणी म्हणजे किडनीवर अत्याचार जोर जबरदस्ती होय! जर तितके पाणी बाहेर काढणे किडनीला शक्य झाले नाही, तर तेच पाणी आपल्या शरीरात अम्लपित्त अपचन सूज सर्दी या स्वरूपात त्रास देते. म्हणून पाणी हे वॉटर थेरेपी सारखे पाच सहा ग्लास / पाच सहा लिटर उठ सूट तहान नसताना पिऊ नये, मे उन्हाळा ऑक्टोबर वगळता दीड लिटरपेक्षा अधिक पाण्याची शरीराला गरज नसते!!!
लक्षात असू द्या, पाण्याचेही पचन व्हावे लागते. साधे पाणी पचायला सहा तास, उकळून गार केलेले पाणी पचायला तीन तास ; तर गरम गरम पाणी पिल्यास ते पचायला साधारण दीड तास लागतो!!! त्यामुळे घटाघटा पाणी पिणे, हे सर्वथैव चुकीचेच होय आणि अधिक पाणी पिल्यास आपल्या पचनाचे जे स्राव आहेत एंजाइम्स आहेत त्याचे कॉन्सेन्ट्रेशन कमी होते त्याची पचवण्याची क्षमता कमी होते आणि अपचन गॅसेस ॲसिडिटी मलावरोध हे आपल्या मागे लागतात. पाण्याबाबत अनेक गैरसमज अनेक थिअरीज आहेत , परंतु पाण्याविषयीचे शास्त्र सांगायचे झाले , तर आत्तापर्यंत जेवढे भाग लिहिलेत , तेवढे एकट्या पाण्यासाठीच खर्ची घालावे लागतील!!
थंड पाण्याचे, गरम पाण्याचे , उकळून गार केलेल्या पाण्याचे, नारळाच्या पाण्याचे, पडणाऱ्या पावसाचे रेन हार्वेस्टिंग च्या पाण्याचे, विहिरीच्या पाण्याचे, नदीच्या पाण्याचे असे सर्व प्रकारच्या पाण्याचे विविध गुणधर्म शास्त्रात सविस्तर वर्णन केलेले आहेत.
पाणी कधी प्यावं किती प्यावं, याचंही थोडंसं शास्त्र आहे.
साधारणतः घनपदार्थ अन्नपदार्थ सॉलिड फूड हे आपल्या एकूण खाण्याच्या क्षमतेच्या एकूण भुकेच्या एकूण आहार कॅपॅसिटीच्या एकूण स्टमक टमी आमाशय पोटातील उपलब्ध जागेच्या निम्मे म्हणजे 50% असावे , जसे की पोळी भाजी भात
तर द्रव पदार्थ म्हणजे पाणी आमटी वरण खीर कढी ताक या बाबी या आपल्या भोजनक्षमध्येच्या एकूण भुकेच्या पोटातील अमाशयातील स्टमक मधील उपलब्ध जागेच्या एक चतुर्थांश म्हणजे 25% इतकेच खावेत!
आणि उर्वरित 25% म्हणजे एक चतुर्थांश हे , भूक पचनक्षमता स्टमक आमाशयातील जागा ही रिकामी ठेवावी म्हणजे आपली पचन संस्था योग्य प्रकारे काम करते.
सावकाश जेवावे असे पूर्वी म्हणत असत, सावकाश याचा अर्थ हळूहळू जेवणे म्हणजे दोन घासांमध्ये अंतर ठेवून जेवणे बकाबका न खाणे घाईघाईने न जेवणे असा जसा होतो,
तसेच सावकाश याचा अर्थ स + अवकाश म्हणजे जागा पोटामध्ये जागा शिल्लक ठेवून जेवावे. अगदी तडस लागेपर्यंत सटायटी satiety लेवल पर्यंत जेवू नये. घशात बोट घातले तर काय खाल्ले ते बोटाला लागेल इतपत जेवू नये, असं विनोदाने म्हणतात!
प्रायः जे पदार्थ पचायला जड आहेत, ते आपल्या एकूण खाण्याच्या क्षमतेच्या निम्मेच खावेत,
तर जे पदार्थ पचायला हलके आहेत, तुलनेने, ते अगदी तृप्तता होईपर्यंत तडस लागेपर्यंत सटायटी लेव्हल पर्यंत खाऊ नये
पाणी कधी प्यावं? किती प्यावं? याचही थोडेसे नियम आहेत.
पाणी जेवणाच्या सुरुवातीला प्यायलं तर, भूक नाहीशी होऊन, अन्नपचन व्यवस्थित न झाल्याने, अन्न अंगी न लागल्याने, माणूस कृश म्हणजे बारीक होऊ शकतो
तर भोजन केल्यानंतर एकदम पाणी पिल्यास कफाचे प्रमाण वाढून माणूस थोडासा स्थूल जाड होऊ शकतो
म्हणून जेवण करताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे असा हितकर भाग होय
शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवटचा घास गोड व्हावा म्हणून शेवटी एखादा तुकडा गोड पदार्थाचा खाणं वेगळं !!!
परंतु शास्त्रीय नियम असे आहेत , की
गोड पदार्थ हे जेवणाच्या सुरुवातीला
आंबट खारट पदार्थ हे जेवणाच्या मध्ये आणि
कडू तिखट आणि तुरट पदार्थ जेवणाच्या शेवटी
कडू तिखट आणि तुरट या पदार्थांचे प्रमाण हे प्रायः हा अत्यल्प असतं ,
म्हणूनच आहारामध्ये त्यांचा समावेश करणे ऐवजी पान खाणे, विडा खाणे, तांबूल सेवन या अर्थी त्याचा समावेश सुचवला गेलेला आहे.
दोन कोवळी पानं, थोडासा चुना, थोडासा कात आणि थोडीशी सुपारी इतकेच चार घटक हे तांबूल विडा खाण्याच्या पानाचे असावेत.
पुढील भागात दूध नेमके कधी किती कसे प्यावे? तूप दही लोणी हे कसे खावेत? दुधामध्ये शतावरी अश्वगंधा हळद हे कशाप्रकारे घालावेत? डिंकाचे लाडू हळिवाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू खारीक खोबऱ्याचे लाडू हे कधी खावे? याविषयी चर्चा करूया!!!
तसेच त्या पुढील भागात, जिभेचे लाड यामध्ये ज्याप्रमाणे गोड पदार्थ येतात तसेच मांसाहार हा ही येतो!! त्याच्यामध्ये लोकप्रिय अशा चिकन अंडी मटण मासे यांच्याही खाण्याचा, त्यांच्या विकल्पांचा म्हणजे ऑप्शन्सचा आणि त्यांच्या चांगले वाईटपणाचा ऊहापोह करूया!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा