सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १७५ ते १८४

अध्याय पहिला

🌧️ सार्थ ज्ञानेश्वरीओव्या

🌨️  ॥अर्जुनविषादयोग॥

🌈  ओवी१७५ ते१८४

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖👁️👇👁️➖➖➖

🔔भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च |महीक्षिताम्।उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति ॥२५॥

अर्थ 👉 भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्या समोर म्हणाला, “हे पार्था, जमलेल्या या कौरवांना पहा.”

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

🔔तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान्।आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रान् पौत्रान् सखींस्थता॥ २६॥

🔔श्वशुरान् सुहृदश्चैव|सेनयोरुभयोरपि ।तान् समीक्ष स कौंतेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् ॥२७॥

अर्थ 👉 त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरु, मामा, बंधु, पुत्र, नातु, तसेच जिवलग मित्र, सासरे, स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यामधे अर्जुनाने पाहिले. तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कुंतिपुत्र ॥१-२६, २७॥

➖➖➖👁️👆👁️➖➖➖

🍉जेथ भीष्माद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख। पृथिविपति आणिक । बहुत आहाति॥१७५॥

✏ अर्जुनाची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्णाने रथ हाकलला आणि दोन्हीही  सैन्याच्या मध्यभागी उभा केला. त्याठिकाणी भीष्म, द्रोणादी राजे समोर उभे होते.

🍉तेथ स्थिर करूनि रथु । अर्जुन असे पाहतु।तो दळभार समस्तु । संभ्रमेसी॥१७६॥

✏ तिथे रथ उभा करून अर्जुन सभोवताली  उत्सुकतेने (सर्व  कौरवसेना आणि पांडवसेनेकडे)  पाहू लागला. 

🍉मग देवा म्हणे देख देख । हे गोत्रगुरु अशेख।तंव कृष्णा मनीं नावेक । विस्मो जाहला॥ १७७॥

✏ मग देवाला म्हणाला, "देवा, पहा हे सर्व आमचे आप्तवर्ग व गुरूजन आहेत. (हे वाक्य आणि यापुढील ओव्या लक्षपूर्वक वाचाव्यात) हे ऐकून कृष्णास जरा आश्चर्यच वाटले. 

🍉तो आपणयां आपण म्हणे । एथ कायि कवण जाणे।हें मनीं धरिले येणें । परि कांही आश्चर्य असे॥ १७८॥

✏ श्रीकृष्ण मनातल्या मनात म्हणतात, अर्जुनाने हे काय मनात धरले कोण जाणे? काहीतरीच  चमत्कारिक प्रकार झाला असावा. 

🍉ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणे हृदयस्थु ।परि उगा असे निवांतु । तिये वेळीं॥ १७९॥

✏ भगवान दुसर्‍याचे मनोगत जाणणारे,  पण त्यावेळेस काहीच न बोलता स्तब्ध राहिले. 

🍉तंव तेथ पार्थु सकळ । पितृपितामह केवळ। गुरू बंधु मातुळ । देखता जाहला॥ १८०॥

✏  तेव्हा अर्जुन आपले वडील, आजे, गुरू, बंधू व मामा यांना पहात होता.

🍉इष्टमित्र आपुले । कुमरजन देखिले। हे सकळ असती आले । तयांमाजि॥ १८१

✏ तेथे आपले इष्टमित्र, कुमार यांना आलेले पाहिले. 

🍉सुहृज्जन सासरे । आणिकही सखे सोईरे । कुमर पौत्र धनुर्धरें । देखिले तेथ॥ १८२॥

✏ आपले जिवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू ही पहात होता .

🍉जयां उपकार होते केले । कां आपदीं जे राखिले। हे असो वडील धाकुले।आदिकरुनि ॥१८३॥

✏ ज्यांच्यावर आपण उपकार  केले  किंवा  संकट काळात  ज्यांना मदत केली, रक्षण केले ते लहानथोर सर्व तेथे आलेले पाहिले.

🍉ऐसे गोत्रचि दोहीं दळीं ।उदित जालें असे कळीं। हें अर्जुने तिये वेळीं । अवलोकिलें॥१८४॥

✏ थोडक्यात  दोन्हीही दळात आपले गोत्रजच  युद्धात  सहभागी आहेत  हे अर्जुनाने पाहिले. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२