सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी ८५ पासून १०१ पर्यंत

अध्याय पहिला

🌈 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🌈 ॥अर्जुनविषादयोग॥

🌈 ओवी ८५ पासून

⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳

🌻  धृतराष्ट्र उवाच | 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः|मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय|| १||" श्लोक १

अर्थ 👉 धृतराष्ट्र म्हणाला - हे संजया, पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर जमलेले युद्धोत्सुक असे माझे पुत्र व पांडव ह्यांनी काय केले ? 

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

🌷तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ॥ म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची॥८५॥

✏  तरी पुत्राच्या  ममतेने मोहित झालेला धृतराष्ट्र  संजयास "हे संजया, कुरू क्षेत्रावर  सद्या काय  चालू आहे ते मला सांग. "

🌷जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनि॥८६॥

✏  ज्या कुरूक्षेत्राला धर्मांचे ठिकाण ही म्हणतात, त्या ठिकाणी  दुर्योधनादी माझे पुत्र आणि धर्मादि पंडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी  गेले आहेत. 

🌷तरी तिहीं येतुला अवसरीं ।काय किजत असे येरयेरीं ।तें झडकरी कथन करी।मजप्रती८७॥

✏ तर ते इतका वेळ झाला परस्परांशी  काय  करत आहेत, हे  मला पटकन  सांगावे.

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌻 "संजय उवाच | 

दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा|आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्||२||


अर्थ 👉 संजय म्हणाला, त्यावेळी पांडवांचे सैन्य तर व्यूह रचनेने उभे राहिलेले पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या समीप जाऊन पुढीलप्रमाणे बोलता झाला.

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌷तिये वेळी तो संजय बोले ।म्हणे पांडवसैन्य उचलले ।जैसें महाप्रळयीं पसरले।कृतांतमुख ८८

✏  तेव्हा संजय सांगतो की महाराज  ज्याप्रमाणे  महाप्रळय होणार  म्हटले  की काळ आपले तोंड मोठे पसरतो तसेच पांडवसैन्य उठाव करून खवळले आहे. 

🌷तैसे तें घनदाट । उठावले एकवाट ।जैसें उसळले कालकूट । धरीं कणव॥८९॥

✏  सर्व  पांडवसैन्य एका  रोखाने  सज्ज झाले आहे  की जसे काळकूट विष उसळले आहे .

🌷ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवाते पोखला । सागर शोषूनि उधवला । अंबरासी॥९०॥ 

✏  ज्याप्रमाणे (वडवानल) अग्नीला सोसाट्याचा  वारा साथीदार  झाला की अग्नीच्या  ज्वाला  समुद्राचे  शोषण  करून आकाशास मिळतील. 

🌷तैसे दळ दुर्धर । नाना व्यूहीं परिकर । अवगमले भयासुर । तिये काळीं ॥ ९१॥ 

✏  त्याचप्रमाणे पांडवसैन्याची  व्यूहरचना इतकी सज्ज झालेली आहे की त्यामुळे  ते अधिकच भयावह दिसत आहेत. 

🌷तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिले कवणे माने । जैसें न गणिजे पंचाननें । गजवटांते॥९२॥ 

✏  असे सैन्य  पाहून दुर्योधनाने बेपर्वाईने तिरस्कार  केला ज्या पद्धतीने  सिंह हत्तीचा कळप पाहून त्यांना  क:पदार्थ मानतो. 

☘☘☘☘🌺☘☘☘☘

🌻"पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्।व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता||३||


अर्थ 👉 हे आचार्य, द्रुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूह रचून उभी केलेली पांडवांची ही मोठी सेना अवलोकन करा.

☘☘☘☘🌸☘☘☘☘

🌷मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला । कैसा दळभारु उचलला।पांडवांचा॥ ९३॥ 

✏  मग दुर्योधन, द्रोणाचार्य (कौरव व पांडवाचे गुरू ) यांच्या जवळ आला आणि म्हणाला, पहा कसे पांडवाचे  सैन्य  उसळले आहे  पहा.

🌷गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते।हे रचिले आथि बुद्धिमंते । द्रुपद्कुमरें॥९४॥

✏  बुद्धिमान अशा द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न याने सैन्याची  अशी व्यूहरचना केली आहे  की हे सैन्य चालत्या  डोंगरी किल्ल्याप्रमाणे भासत आहे.

🌷जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनी कुरुठा केला।तेणे हा पाखरिला । देखदेख॥९५॥

✏  आणि त्याला आपणच गुरूदेव विद्या दिलीत आणि त्याने ही सेना समुद्रासारखी पसरविली आहे .

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌻"अत्र शूरा महत्वाचा भीमार्जुनसमा युधि।युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ:॥४॥"


अर्थ. 👉या सेनेमधे भीमार्जुनांसारखे युद्धामधे शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत. (त्यांची नावे सांगतो ऐका) सात्यकि, विराट, महारथी द्रुपद, -

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌻आणिकहीअसाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण।जे क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती॥९६॥

✏  धृष्टद्युम्न  हा एकटाच नाही  तर असे अनेक असाधारण  महान योद्धे  पांडवसैन्यात आहेत.

🌷जे बळें प्रौढी पौरुषें ।भीमार्जुनांसारिखे।ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि॥९७॥

✏  जे योद्धे  बलाने, योग्यतेने व पुरूषार्थाने भीमार्जुनाच्या तोडीचे आहेत, त्यांचे वर्णन येईलच.

🌷एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु।महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु॥९८॥

✏  येथे महायोद्धा सात्यकी राजा, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा आलेले आहेत.

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌻धृष्टकेतुश्चेकितान: काशिराजश्च वीर्यवान।पुरुजित् कुंतिभोजश्च शैब्यश्च नरपुंगव:॥५


अर्थ.👉धृष्टकेतु, चेकितान, वीर्यसंपन्न काशीराजा, पुरुजित, कुंतिभोज, नरवीर शैब्य

🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀

🌻युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान्।सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ:॥६॥


 अर्थ 👉 पराक्रमी युधामन्यु, वीर्यशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत.

☘☘☘☘🌺☘☘☘☘

🌷चेकितान धृष्टकेतु ।काशिश्वरु विक्रांतु।उत्तमौज नृपनाथु ।शैब्य देख॥९९॥

✏  ही विविध राजांची नावे आहेत जे युद्ध करण्यासाठी येथे आहेत (एक शब्द  एक राजा ☝) 

🌷हा कुंतिभोजु पाहे । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखे॥१००॥

✏  पांडवाच्या बाजूचे विविध राजे, योद्धे, दुर्योधन  गूरू द्रोणाचार्य  यांना  दाखवतो आहे.

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२