सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १०१ते ११०
अध्याय पहिला
🌈 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌈 ॥अर्जुनविषादयोग॥
🌈 ओवी १०१ते ११०
⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳
🌷हा सुभद्रहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु ।तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा॥१०१॥
✏ दुर्योधन द्रोणाचार्यास म्हणतो की तो पहा तो सुभद्रेच्या अंत:करणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रति अर्जुन असा अभिमन्यु.
🌷आणिकही द्रौपदीकुमर । के सकळही महारथी वीर।मिती नेणिजे अपार । मीनले आणि ॥१०२॥
✏ तसेच आणखी ही द्रौपदीकुमर आणि इतरही मुलगे, महारथी योद्धे ज्यांना मोजणेही शक्य होणार नाही.
🌈🎯🌈🎯🌈🎯🌈🎯🌈
🌻अस्माकं तु विशिष्टा ये तान् निबोध द्विजोत्तम।नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते॥ ७॥
अर्थ 👉 हे द्विजश्रेष्ठ आचार्य, आता आमच्या पक्षातले जे प्रमुख महारथी व माझ्या सैन्याचे जे अधिकारी आहेत, त्यातील काही नावे दिग्दर्शनार्थ मी तुम्हाला सांगतो, ती आपण ऐकावीत.
🌈🎯🌈🎯🌈🎯🌈🎯🌈
🌻भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिंजय:।अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तिस्थैव च॥८॥
अर्थ 👉 आपण स्वत:, भीष्मचार्य, कर्ण, जयशाली कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, त्याचप्रमाणे सोमदत्तपुत्र भूरिश्रवा,
🌈🎯🌈🎯🌈🎯🌈🎯🌈
🌷आतां आमुचां दळीं नायक । जे रूढ वीर सैनिक।ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥ १०३॥
✏ दुर्योधन म्हणतो की आता आपल्या सैन्यातील वीरांची नावे पाहू.
🌷उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी।तुम्हीआदिकरूनि । मुख्य जे जे॥१०४॥
✏ प्रथम द्रोणाचार्य आणि आणखी जे जे मुख्य वीर आहेत त्यांची नावे सांगतो.
🌷हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानू ।रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु॥१०५॥
✏ हे गंगानंदन भीष्म, जे शौर्याने आणि तेजाने प्रती सूर्य भासतात. हा माझा मित्र कर्ण जो शत्रूला सिंहासारखा वाटतो.
🌷या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्व होय संहरे ।हा कृपाचार्य न पुरे ।एकलाचि ॥१०६॥
✏ या वीरांच्या एका संकल्पाने या पूर्ण विश्वाचा संहार होईल. फार काय हे कृपाचार्य तर एकटेच सर्वांना पुरे आहेत.
🌷एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें।याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं॥१०७॥
✏ इथे आपल्याकडे विकर्ण आणि अश्वत्थामा असे वीर आहेत की यमही त्यांना घाबरतो.
🌷समितिंजयो सोमदत्ति । ऐसे आणिकही बहुत आहाती॥जयाचिया बळा मिती । धाताही नेणे॥१०८॥
✏ हा सौमदत्ती आणि असे बरेच वीर जे युद्धात कधीही पराभूत झाले नाहीत.
🌈🎯🌈🎯🌈🎯🌈🎯🌈
🌻अन्ये च बहव: शूरा मदर्थे त्यक्तजीविता:।नानाशस्त्रप्रहरण: सर्वे युद्धविशरद:॥९॥
अर्थ 👉 आणखी इतरही अनेक वीर माझ्याकरता जिवावर उदार झालेले, नाना प्रकारच्या शस्त्रांनी संग्राम करणारे आणि सर्वही युद्धशास्त्राप्रमाणे प्रवीण असे आहेत.
🌈🎯🌈🎯🌈🎯🌈🎯🌈
🌷जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त।हो कां जे अस्त्रजात । एथूनि रूढ।१०९॥
✏ ज्यांच्या शौर्याचा अंत ब्रह्मदेवालाही लागत नाही. असे कितीतरी वीर आहेत.
🌷हे अप्रतिमल्ल जगीं ।पुरता प्रतापु अंगी ।परी सर्व प्राणें मजचिलागी । आराइले असती ॥११०॥
✏ हे अती बलवान असले तरी, त्यांच्या अंगी प्रताप भरलेला आहे तरी ते सर्वभावे ( तन मन धन ) मलाच साथ देणार आहेत.
याप्रमाणे दुर्योधन आपल्या सैन्यातील वीरांची नावे घेऊन स्तुती करतो आहे.
हे सर्व वर्णन संजय ऐकून, आपल्या राजाला, धृतराष्ट्राला सांगत आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा