सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी१४९ ते१६३

 अध्याय पहिला

🙏  सार्थ ज्ञानेश्वरीओव्या

👉  ॥अर्जुनविषादयोग॥

🔰  ओवी१४९ ते१६३

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🍏अनंतविजयं राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः| नकुलः सहदेवश्चं सुघोष्मणिपुष्पकौ॥ १६॥

अर्थ 👉 कुंतुपुत्र राजा युधिष्ठाराने अनंतविजय, नकुलाने सुघोष, आणि सहदेवाने मणिपुष्पक -

➖➖➖➖➖➖➖➖

🌸तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गंहिरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे॥१४९॥

✏  त्या शंखाचा अतीगंभीर ध्वनी महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. त्यातच धर्मराजाने अनंतविजय नावाचा शंख वाजविला.

🌸नकुळें सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु।जेणें नादें अतंकु । गजबजला असे॥ १५०॥

✏ नकुलाने सुघोष तर सहदेवाने मणिपुष्पक नावाचे शंख  वाजविले, त्या आवाजाने प्रत्यक्ष यमाचेही धाबे दणाणून गेले. 

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

💚काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः|दृष्टद्युम्नो विराटश्च सातकिश्चापराजितः ॥ १७॥

अर्थ 👉 महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टधुम्न, विराट, शत्रुकडून कधीही पराजय न पावलेला सात्यकी, ➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

🍏द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेशः पृथिवीपते | सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दध्मुः पृथक् पृथक्॥१८॥

अर्थ 👉 द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु अभिमन्यु इत्यादिकांनी, हे पृथ्वीपते, धृतराष्ट्रा, चोहोकडून सर्वांनी आपापले शंख वाजवले. 

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

🌼तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक।हा काशीपती देख । महाबाहु ॥१५१॥

✏  या युद्धभूमीवर दृपद राजा द्रौपदीचे पुत्र, आणि काशीराजा हे योद्धे जमले होते. 

🌼तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु ।दृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन॥१५२॥

✏ अर्जुनाचा पूत्र अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकि  नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न आणि शिखंडी जमले होते. 

🌼विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नाना शंख निरंतर । आस्फुरिले॥१५३॥

✏ त्याचप्रमाणे विराट राजा आणि इतर मुख्य वीर सैनिक यांनीही आपापले शंख वाजविले. 

🌼तेणें महाघोषनिर्घातें । शेषकूर्म अवचिते।गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती॥१५४॥

✏ त्या शंखांच्या आवाजाने शेष कूर्म हे दचकले आणि पृथ्वीचा भार सोडून देतात की काय  असे झाले. 

🌼तेथ तिन्हीं लोक डंडळित । मेरु मांदार आंदोळित ।समुद्रजळ उसळत ।कैलासवेरी॥१५५॥

✏ तसेच तीनही लोक ( स्वर्ग, मृत्यू, पाताळ ) आणि मेरू व मांदार हे पर्वत डळमळू लागले. समुद्रजळ  कैलासापर्यंत उसळले.

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

🍏स घोषो धार्त्रराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।नभश्च पृथिवींश्चैव तुमुलो व्यनुनादयन्॥१९॥

अर्थ 👉 पृथ्वी व आकाश ही दणाणून सोडणार्‍या त्या शंखाच्य़ा) तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली.

➖➖➖👁️🌸👁️➖➖➖

🌸पृथ्वीतळ उलथों पाहत । आकाश असे आसुडत। तेथ सडा होत । नक्षत्रांचा।।१५६॥

✏ पृथ्वी पालथी होते की काय, आकाश कोसळून  पडते की काय  किंवा नक्षत्रांचा पाऊस पडतो की काय असे वाटले. 

🌸सृष्टि गेली रे गेली ॥ देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटिली । सत्यलोकीं।१५७ ॥

✏ सत्य लोकी तर सृष्टी बुडाली आहे असे आणि देव  निराधार झाले अशी हाकाटी झाली. 

🌸दिहाचि दिन थोकला ।जैसा प्रलयकाळ मांडला।तैसा हाहाकारु उठिला । तिन्हीं लोकीं॥१५८॥

✏ सूर्य दिवसाच थांबले आणि प्रलय झाला. तिन्ही  लोकी हाहाकार उठला .

🌸तंव आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु।मग लोपला अद्भुतु । संभ्रमु तो॥१५९॥

✏ ते पाहून भगवान श्रीकृष्णही विस्मित झाले आणि कदाचित पृथ्वीचा अंत होईल असे जाणून त्यांनी सर्व  गोंधळ बंद केला.

🌸म्हणोनि विश्व सांवरले । एर्‍हवीं युगांत होतें वोडवले।जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं॥१६०॥

✏ म्हणून  हे जग वाचले नाहीतर त्या आवाजानेच या जगाचा अंत झाला असता. 

🌸तो घोष तरी उपसंहरला । परी पडिसाद होता राहिला॥ तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥१६१॥

✏ पांडवसैन्यातील शंख तर बंद  झाले पण त्याच्या प्रतिध्वनीच्या आवाजानेच कौरवसैन्याची दाणादाण  झाली. 

🌸तो जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु।तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया॥१६२॥

✏ ज्याप्रमाणे सिंहाच्या आवाजाने हत्तींच्या कळपाची पांगापांग होते तसे कौरवसैन्याची दाणादाण झाली. 

🌸तो गाजत जंव आइकती ।तंव उभेचि हिये घालिती।एकमेकांते म्हणती । सावध रे सावध॥१६३॥

✏ जेव्हा  गाजत असलेला तो प्रतिध्वनी ऐकला तेव्हा सर्वांनी धैर्य सोडले. आणि एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२