Pinnaple fruit & its uses

 अननस





उन्हाळ्यात मिळणारे फळ. अननसाच्या एकूण ९० जाती आहेत. पिकलेला अननस चवीला गोडसर पण थोडा जरी कच्चा असेल तर आंबट लागतो. पचनानंतर देखील गोडाप्रमाणे काम करतो. थंड गुणाचा आहे. पचायला थोडा जडच आहे. अननस खाल्ल्यानंतर तोंडाला चव येते. भुक लागण्यास सुरुवात होते. अननसामुळे पोट साफ होते, लघवीला पण भरपूर प्रमाणात आणि साफ होते. त्यामुळे मुतखडा असणारे, लघवीला गरम, वेदनायुक्त आणि अडखळत होत असल्यास अननस खाल्ल्याने बरे वाटते. हृदयविकारात पिकलेल्या अननसाचे सरबत किंवा मुरंबा फार उपयोगी आहे. अननसामुळे जंत मरुन पडतात. त्यामुळे फक्त जंताची गोळी खाण्यापेक्षा अननस खाल्ल्याने जंत मरून पडतात, पोट साफ होते आणि भुक देखील चांगली लागते. उन्हाळ्याच्या दिवसात ब-याच जणांचा घोणा फुटतो म्हणजे नाकातून रक्त येते. वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातून अशाप्रकारे रक्त जाते तेव्हा या आजाराला रक्तपित्त असे म्हणतात. काविळ आणि रक्तपित्तामध्ये अननस उत्तम गुणकारी आहे. उन्हाळ्यात वाढलेली उष्णता आणि थकवा,अशक्तपणा, रखरख/रूक्षता/कोरडेपणा अननसामुळे कमी होते. अननस गर्भाशयाला तीव्र उत्तेजना देऊन पाळी आणण्याचे काम करतो. त्यामुळे ज्या मुलींची पाळी लांबते किंवा पाळीच्या वेळेस प्रचंड पोटदुखी जाणवते अशा मुलींनी अननस खावा. परंतु गरोदर स्त्रीने सुरूवातीच्या काळात अननस खाल्ला तर १२ तासांत तीन महिन्यांचा गर्भ पडतो. पण ज्या गरोदर स्त्रीला दिवस संपले तरी प्रसववेदना / कळा येत नाहीत तेव्हा तिने अननस खाल्ल्याने बाळंतपण सुरू होण्यास मदत होते.
वैद्य.वैशाली माने, सातारा.
यश क्लिनिक आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नटराज मंदिराच्या कमानीतून आत, कृष्णानगर, सातारा. 📞📞 9423826921
May be an image of fruit and text
DrRupali Dhutre Sangle, Preety Khadtare and 37 others
5 comments
1 share
Like
Comment
Share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२