Fungal Infections Information in Marathi
Fungal Infections फंगल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन हे शब्द आपल्या नेहमी कानावर पडतात. व्हायरल इन्फेक्शन हे व्हायरसमूळे होते तर फंगल इन्फेक्शन हे फंगसमूळे होते. फंगस हे एक प्रकारचे परोपजीवी आहेत. त्यांचेमध्ये स्वत:चे अन्न तयार करण्याचे सामर्थ्य नसते. त्यामूळे फंगस हे दुस-या एखाद्या सजीव किंवा मृत शरीराच्या आश्रयाने वाढते. दलदलीच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी किंवा शरीरात ओलावा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी फंगस वाढते. फंगल इन्फेक्शन हे साधारणत: पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येते. काही विशिष्ट स्थितीमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते. उदा. १) मधुमेह २) पोषक आाहाराची कमतरता ३) प्रतिकारशक्ती खालावणे ४) रक्तातील पांढ-या पेशींची संख्या कमी होणे ५) दिर्घकालीन एन्टीबायोटीक्सचे सेवन करणे ६) आय. व्ही कॅथेटर किंवा सलाईन इंजेक्शन देण्यासाठी लावलेली सूई बरेच दिवस असणे. ७) रेडीओथेरपी किंवा प्रतिकारशक्ती दाबून टाकणारी औषधे किंवा पेशींसाठीचे घातक औषधे यांच्यामूळे पेशींची प्रतिकार शक्ती कमी होणे. ८) काही वेळा स्टिरॉईडस...